Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


मनाची व्यथा....

 मनाची व्यथा.... 
 
    मुंबई -दि. 23 आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - (संजय डुबल) हे असे प्रश्न पडले पाहिजे  ! पण आपण काय करतो नको ते विचार मांडतो  ! 
     मानसाला स्व:ताला खरे प्रश्न पडले पाहिजेत..... माझ्या गावाच भलं कस होईल,  माझ्या गावात प्राथमिक सुविधा कशा उपलब्ध होतील. माझ्या पडवणेवाडी-- वरवडे गावातील गरीब ग्रामस्थांना पडवणे खाडीवर सरकारी पुलबांधुन मिळावा, वाडीत रस्ता व्हावा ! पडवणेवाडीला पुर आणि समुद्र ताणाच्या भरती मुळे उसळत्या समुद्र लाटांच्या मार्यानी पुढून पुराच्या पाण्यानी आणि वाडीच्या मागच्या बाजूला प्रचंड लाटांच्या मार्यानी जवळजवळ ३५ एक मिटर जमीन फुटून पाण्यात वाहून गेली.... पडवणेवाडीला तटबंद बंधारा 'संरक्षण भिंत'लवकरात लवकर बांधून मिळावी (एक कोटी ऐशी लाख पास होऊन सुध्दा संरक्षण भिंतीच काम का सुरू होत नाही) याच विवंचने पोटी मनाची तळमळ - सु. बा. सरपडवळ         ( नाटककार )                    नाटककार सु. बा. सरपडवळ 
यांनी भरसभेत बोलून दाखवली.... मंत्री - उदयजी सामंत यांच्या संयुक्त ग्रामस्थ सभेत. 
                                राम सारंग 
          तर राम सारंग  ( कामगार रंगभूमीवरील दिग्दर्शक ) रत्नागिरीतील गावडेआंबेरे यांनी ही थोडक्यात आपले मत व्यक्त केले. व इतर ही व्यक्तीनी आपापले विचार या वेळी मांडले ... 
       सदर महाराष्ट्रचे उद्योग मंत्री श्रीमान उदयजी सामंत साहेब यांनी सभेत आपली कार्य कुशलता थोडक्यात सांगताना म्हटले संपूर्ण कोकण कार्य विनित आहे रत्नागिरी जिल्ह्यातील कामांचा आपल्या समोरच कारोबार आहे! प्रथम आपल्या सर्वांची हात जोडून माफी मागतो! आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमाला यायला मला उशीर झाला त्याबद्दल शमस्व ! कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज निलेश राणे यांच्या शिवसेनेत प्रवेश करताना हजर रहाणार होते परंतु ते एका मोठ्या कार्यक्रमात गुंतल्या मुळे ती जबाबदारी माझ्यावर आली  ! म्हणून मला इथे यायला उशीर झाला! अस बोलून पुन्हा एकदा हात जोडले.

मला वाटते आपल्या कोकणातील चाकरमानी आपापली कुटुंब, घर तिकडे सोडून हिकडे मुंबईत नोकरी- उद्योगा साठी येतात पण बर्यापैकी पगारी नोकरी मीळत नाही आणि मिळालीच तर भाड्याने रहाणे परवडत नाही ! म्हणून मी रत्नागिरीतील चंपक मैदानावर प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र आणि एम आय डी सी कंपनी सुरू करणार आहे ! जेणेकरून रत्नागिरी जिल्ह्यातील मुल/ मुली तिकडेच काम करतील!      मुंबईत दूरवर खस्ता खात यावे लागणार नाही, हे केवळ तुम्हा सर्वांनच्या हातात आहे ! 
एवढे बोलून सामंत साहेब थांबले, आणि कोकण वासियांच्या मेळाव्याचे समारोप झाला.
        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement