Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयना धरण पाणीस्थिती (28 जुलै 2026): उपयुक्त पाणीसाठा 74.86% वर; 29 जुलै रोजी कोयना नदीपात्रात होणार विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

                                    कोयना धरण संग्रहित छायाचित्र 
कोयनानगर, दि. 28 जुलै :(संजय डुबल ) कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून मंगळवार (28 जुलै) सकाळी 8 वाजेपर्यंत धरणातील उपयुक्त पाणीसाठा 74.96 टीएमसी (74.86 टक्के) इतका झाला आहे. धरणाची पाण्याची पातळी 2141 फूट 03 इंच (652.653 मीटर) इतकी नोंदविण्यात आली आहे.
धरणातील एकूण (ग्रॉस) पाणीसाठा 80.08 टीएमसी (76.09 टक्के) इतका असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धरणातील जलसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे.
मागील 24 तासांत कोयना येथे 76 मिमी, नवजा येथे 394 मिमी पावसाची नोंद झाली असून अनुक्रमे हंगामातील एकूण पर्जन्यमान 2643 मिमी आणि 3184 मिमी इतके झाले आहे. महाबळेश्वर येथे हंगामातील एकूण पर्जन्यमान 3039 मिमी इतके नोंदविण्यात आले आहे.
धरणात सध्या 24,938 क्युसेक (2.16 टीएमसी) पाण्याची आवक सुरू असून धरणातून कोयना जलविद्युत प्रकल्प (KDPH) तसेच रेडियल गेटद्वारे कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. त्यामुळे धरणातून एकूण विसर्ग शून्य क्युसेक आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा वाढत असून आगामी काळात होणाऱ्या पर्जन्यमानावर धरणातील जलसाठ्याची स्थिती अवलंबून राहणार आहे.

🚨*कोयना धरण*🚨

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. 

कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी *उद्या दि. २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९:०० वा. धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून १०५० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे*

तसेच सोडण्यात येणार्‍या विसर्गामध्ये पावसाच्या प्रमाणानुसार व येणार्‍या येव्या नुसार बदल होऊ शकतो.

धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. तरी नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद घ्यावी. असे कार्यकारी अभियंता कोयना सिंचन विभाग, कोयनानगर यांचे वतीने कळविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement