कोयना धरणातील उपयुक्त पाणीसाठा 80.88 टक्क्यांवर; धरणातून 6,129 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
कोयना नगर - संजय डुबल : दि. 31 जुलै 2026
सतत सुरू असलेल्या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ कायम असून, शुक्रवार (31 जुलै) सकाळी 8 वाजेपर्यंत धरणातील उपयुक्त पाणीसाठा 80.88 टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणाची पाणीपातळी 2148.00 फूट (654.710 मीटर) इतकी नोंदविण्यात आली आहे.
सध्या धरणातील एकूण (Gross) पाणीसाठा 86.11 टीएमसी (81.81%), तर उपयुक्त (Live) पाणीसाठा 80.99 टीएमसी (80.88%) इतका आहे.
गेल्या 24 तासांत कोयना येथे 121 मिमी, नवजा येथे 174 मिमी पावसाची नोंद झाली असून, हंगामातील एकूण पाऊस अनुक्रमे 2895 मिमी आणि 3509 मिमी इतका झाला आहे. महाबळेश्वर येथे हंगामातील एकूण पाऊस 3485 मिमी इतका नोंदविण्यात आला आहे.
धरणात सध्या 25,005 क्यूसेक्स (2.16 टीएमसी) पाण्याची आवक सुरू आहे. दरम्यान, केडीपीएचमधून 1,050 क्यूसेक्स आणि रेडियल गेटमधून 5,079 क्यूसेक्स असा मिळून एकूण 6,129 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
प्रशासनाने कोयना नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, नदीपात्रात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
🚨*सावधानतेचा इशारा*🚨
*कोयना धरण*
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे.
कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी काल दि. ३० जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फूटाने उघडून ५,०७९ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.*
कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून त्याद्वारे १०५० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. *कोयना नदीमध्ये एकूण ६,१२९ क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे.*
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येणार्या येव्यानुसार सांडव्यावरून विसर्ग वाढवला जाऊ शकतो.
धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. तरी नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद व उचित खबरदारी घ्यावी असे आवाहन कोयना धरण व्यवस्थापन यांनी केले आहे..


0 टिप्पण्या