पाटण तालुक्यासाठी मोफत वीज मिळावी यासाठी मनसेचे आझाद मैदानात उपोषण...
मुंबई :दि. १३ : आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - संजय डुबल :- पाटण तालुक्यातील जनतेला घरगुती वीज मोफत मिळावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाटण तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण सुरू करण्यात आले असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
या आंदोलनात पाटण तालुक्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, उद्योजक तसेच पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पाटण तालुका अध्यक्ष गोरखभाऊ नारकर, शहर अध्यक्ष चंद्रकांत बामणे, तालुका उपाध्यक्ष संजय सत्रे, राहुल संकपाळ, विभाग अध्यक्ष रामचंद्र माने, हणमंत पवार, पांडुरंग पवार, चंद्रकांत पवार, उद्योजक बाबूशेठ पवार, सुनील पाटील, जालिंदर पवार, भाऊसो पवार, अरविंद पवार आणि शंकर जाधव उपस्थित होते.
तसेच मनसेचे अनुशक्ती विभाग अध्यक्ष रवींद्र शेलार, मुंबई CID विभागाचे अविनाश कवठेकर, पाटण तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी, विश्वास पवार, कृष्णात पाटील, प्रदीप जाधव, राम पाटील, अविनाश पवार आदी मान्यवरांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
पाटण तालुक्यातील जनतेला घरगुती वीज मोफत मिळावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत असून शासनाने याची तात्काळ दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
— आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - 9172830799


0 टिप्पण्या