जि. प. प्राथमिक शाळा रामापूर पाटण क्र. २ मध्ये स्वातंत्र्यदिनाचा अभूतपूर्व सोहळा उत्साहात संपन्न
रामापूर (ता. पाटण) प्रतिनिधी : जि. प. प्राथमिक शाळा रामापूर पाटण क्र. २ येथे १५ ऑगस्ट रोजी भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेत विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पाटण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. विकास हादवे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. हादवे मॅडम उपस्थित होत्या. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. जुबेर मुल्ला, उपाध्यक्ष मा. आरिफ शेख, शिक्षणतज्ज्ञ सौ. शिवांजली लोहार मॅडम, अंगणवाडी सेविका, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कवायत, संचलन, समूहगीत, वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धा यांसारख्या विविध कार्यक्रमांमधून आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी
इयत्ता १ ली
- प्रथम : आयुष अजित लोहार
- द्वितीय : सान्वी संतोष कांबळे
- तृतीय : समर्थ शशिकांत शिंदे
इयत्ता २ री
- प्रथम : सुधांशू ओंकार पाटील
- द्वितीय : राबिया मुजफ्फर सय्यद
- तृतीय : अभिज्ञा सूर्यकांत कांबळे
इयत्ता ३ री
- प्रथम : गौरी भरमानी शेलार
- द्वितीय : स्नेहा संतोष जाधव
- तृतीय : रूहान मोहसीन मुकादम
चित्रकला स्पर्धा (इयत्ता ४ थी)
- प्रथम : अनन्या सूर्यकांत सुतार
- द्वितीय : स्वराज दीपक मोहिते
- तृतीय : दुर्वा संतोष कांबळे
वक्तृत्व स्पर्धा
- प्रथम : सदफ समद मुल्लापाट
- द्वितीय : आराध्या संजय कदम
- तृतीय : सुधांशू ओंकार पाटील
- चतुर्थ : बरिरा शोएब शेख
- पंचम : आयुष अजित लोहार
यावेळी प्रमुख पाहुणे मा. विकास हादवे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक श्री. सुमित देसाई यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शितल कोळेकर मॅडम यांनी केले. शाळेचे उपशिक्षक श्री. कांबळे सर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. तर शाळेच्या कला शिक्षिका सौ. सोनाली यादव मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, पालक व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावरील उपस्थिती आणि देशभक्तीच्या वातावरणात हा स्वातंत्र्यदिन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व संस्मरणीय ठरला
संपादक - 9172830799


0 टिप्पण्या