Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


गौण खनिज उत्खनन व वाहतूकी मधून झालेली वसुली ३६ लक्ष शासनाला जमा - तहसिलदार रमेश पाटील.

पाटण - प्रतिनिधी (चंद्रकांत सुतार) - 
पाटण मध्ये आतापर्यंत सुमारे 43 माती उत्खनन साठी परवाने दिले असून, सुमारे 15000 ब्रास ची स्वामित्व धनाची रक्कम 36 लक्ष शासनाला जमा झाली असून, वाहतुकी संदर्भात निश्चित केलेल्या अटी शर्तीचे उल्लंघन केले म्हणून, 10 वाहनांना 2.75 लक्ष रुपयांचा दंड केला असून, आज देखील मल्हारपेठ परिसरात 4 वाहनांना दंड करण्याची प्रक्रिया सुरू आहे, एकंदरीत पाटण मध्ये सुमारे 15000 ब्रास साठी सुमारे 40 लक्ष रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे.
         सदर परवाने देताना संबंधित जमीन मालक लागायचे, शेतकरी संबंधित ग्रामपंचायत चे ना हरकत प्रमाणपत्र, कोयना जलसिंचन विभागाचे ना हरकत , वीज वितरण कंपनी इत्यादी यंत्रणेचे ना हरकत, घेऊन सदर परवाने तहसीलदार यांनी रीतसर रॉयल्टीची रक्कम भरून घेऊन  निर्गमित केलेले आहेत. उत्खनन किंवा वाहतुकी संदर्भात अटी शर्तीचे भंग केला म्हणून वेळोवेळी तपासणी करून दंड देखील संबंधितांना केलेला आहे,  तसेच भविष्यात देखील आवश्यक ती कार्यवाही नक्की करण्यात येईल.  
       समाज माध्यमात प्रसिद्ध झालेल्या काही वृत्ताच्या आधारे नायब तहसीलदार श्री तुषार बोरकर यांचे नेतृत्वाखाली उत्खनन झालेल्या ठिकाणी पंचनामे देखील करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पंचनामे करण्यात आलेल्या ठिकाणी कुठेही अतिरिक्त किंवा मोठ्या प्रमाणात उखनन झाल्याची बाब निदर्शनास आलेली नाही . 
  मौजे कराटे येथील उत्खनन साठी दिलेला  परवाना हा देखील  स्थानिक जमीन मालक व लगतचे शेतकरी यांचे नाहरकत घेऊन ,तसेच सदर ग्रामपंचायतीचे सरपंच यांचे नाहरकत घेऊन देण्यात आला आहे. शिवाय रस्त्यापासून पुरेसे सुरक्षित अंतर ठेवूनच सदर ठिकाणी उखनन झाले असल्याची बाब माझे निदर्शनास आणून दिली आहे, तरी देखील यासंदर्भात आक्षेप प्राप्त झाल्याने सदरचे उत्खनन तात्काळ मागच्या आठवड्यातच थांबविले असून, या बाबत सर्व संबंधितांकडे चौकशी करून पुढील योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. 
       पाटण तालुक्यातील वीटभट्टी मालक चालक संघटनेने व कुंभार समाजाच्या प्रतिनिधींनी सदर व्यवसाय हा कोरोणा मुळे 2 वर्षांपासून ठप्प झाला होता, मागील वर्षी कुठेतरी सुरवात झाली होती व यावर्षी खऱ्या अर्थाने सदर व्यवसाय रुळा वर येत असताना सदर व्यवसायाला शासनाने  आधार दिला नाही, तर या व्यवसायावर सुमारे 10 ते 11 हजार कुटुंब अवलंबून आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याचे प्रांताधिकारी यांना त्यांनी समक्ष भेटून विनंती केली आहे . 
     तथापी शासनाचे नियम व अटी च्या अधीन राहूनच त्यांनी माती वाहतूक किंवा उत्नखन करणे आवश्यक असल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. तसेच  पुढील काळात देखील तालुका  प्रशासन तथा तहसिलदार व त्यांची संपूर्ण टीम हे नियमानुसार कार्यवाही नक्कीच करतील, या व्यतिरिक्त आपल्या काही सूचना असतील व आमच्या निदर्शनास आलेल्या नसतील तर आम्हास कळवण्यात याव्यात असे आवाहनही तहसिलदार रमेश पाटील यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement