Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


समाजाचे आपणही देणे लागत असल्याने प्रत्येकाने सेवा भाव जोपासत आपली जबाबदारी पार पाडावी. - ट्विंकल राजू भोसले.

मुंबई - संजय डुबल -     
       समाजाचे आपणही देणे लागतो, ही बाब प्रत्येकाने लक्षात घेऊन सेवाभाव  जाणीवपुर्वक जोपासायला हवा आणी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडायला हवी. निराधार तसेच वृध्दांची सेवा हे पुण्यकर्म 'जागतिक महिला दिनी' माझे व माझे सहकार्यांचे हातुन घडत आहे.  यापुढे अशीच सत्कर्म माझे हातुन घडत रहावीत, हीच माझी इच्छा असल्याचे मनोगत 'स्टार इव्हेंट'च्या प्रमुख ट्विंकल राजू भोसले यांनी  जागतिक महिला दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. 
      मुंबई येथील 'स्टार इव्हेंट' यांचे वतीने यावेळी सर जे जे वृध्दाश्रमात निवासी महिलांसाठी, मोफत साडी वाटप, भेट वस्तु व अल्पोपहाराचे  वाटप करण्यात आले. स्टार इव्हेंट च्या प्रमुख ट्विंकल राजू भोसले तसेच प्रमुख मान्यवरांचे हस्ते साडीवाटप, भेटवस्तुंचे वाटप करण्यात आले. 
     यावेळी वृध्दाश्रमातील सर्वांंचे करमणुकीसाठी 'सफर सुरों का' या कार्यक्रमाचही आयोजन करण्यात आले. होते. 
   या वेळी चित्रपट मालीकेतील अभिनेते संजय डुबल यांची प्रमुख उपस्थिती होती. 
     तर यावेळी स्टार ईव्हेंट च्या प्रमुख ट्विंकल राजू भोसले, गायक - गायिका- सुचित्रा लोंढे, संचिता मोरजकर, रूपा आंब्रुळे, अनिता रावत, पंकज गमरे, गुर्मित सिंग, शाम मोहिते, विजय कांबळे, संगीत संयोजक - रूपेश, खरात, वादक टिम-  रोशन कांबळे , महेश जाधव,गणेश पुजारी, साऊँड डि जे शैलेश आदींनी कार्यक्रम यशस्वी केला. 
     विजय कांबळे व शाम मोहीते यांनी या कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. 
     या वेळी 80 वर्षांच्या वयोवृध्द आजींसह अनेकांनी आपले दुःख विसरुन गायन तसेच नृत्यात सहभाग घेत आनंद व्यक्त केला. वृध्दाश्रमातील जवळपास सर्वांनीच सहभाग घेतला.   अनेक आजी, आजोबांनी आपल्या भावना व्यक्त करत, उपस्थितांचे मनाचा वेध घेतला. 
     येथील वृध्दाश्रमातील निवासी आजी आजोबांचे निरागस चेहरे व  'पुन्हा लवकरच या' ही त्यांच्या  भावनिक सादाने, निरोप घेताना सर्वांनाच गहिवरून आले.
      जागतिक महिला दिना निमित् आयोजित या कार्यक्रमाने दुःखी - कष्टी वृद्ध आजी- आजोबांचे चेह-यावर ताप्तुरता का होईना दिसलेला 'आनंद' आयोजक तसेच  उपस्थितांना समाधान देऊन गेला. 
   छायाचित्रणाची जबाबदारी ड्यारी परेरा यांनी सांभाळली,अँकरींग पंकज गमरे यांनी, सुत्रसंचालन संदिप वगळ यांनी तर उपस्थितांचे आभार ट्विंकल राजू भोसले यांनी मानले

https://youtu.be/LwJmUMzQ_tQ
या कार्यक्रमाचे निवडक क्षण आपण युट्युब चे CINE EXPERT या चॕनेल वरही पाहु शकता. सर्वांनी पुर्ण video आवश्य पहा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement