Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


मुंबई स्टुडीओत पारंपारीक पध्दतीने गुढीपाडवा संपन्न...नवोदित तसेच होतकरु कलावंतांसाठी 'मुंबई स्टुडीओ' उपयुक्त.

मुंबई - विजय कांबळे (प्रतिनीधी) - मराठी नवीन वर्ष 'गुढी पाडव्याचे'  साधत करीरोड येथील 'मुंबई स्टुडीओ'मध्ये गुढी उभारून गुढीपाडवा पारंपारीक पध्दतीने साजरा करण्यात आला. 
       
मुंबई स्टुडीओ मध्ये अधुनिक साऊंड, रेकाॕर्डींग सिस्टीम, रिहर्सल, मिनी पार्टी साठी उपयुक्त हाॕल असुन गायक, गायिका, वादक, यांचे साठी कराओके, शास्त्रीय संगीत क्लासेस सुरू करण्यात येत आहेत. रिहर्सल साठी संगीत प्रेमींना उपयुक्त असा स्टुडीओ असुन नविन होतकरु कलाकारां साठी संधी उपलब्ध करून देण्याची संकल्पना मुंबई स्टुडीओच्या प्रमुख सुचित्रा लोंढे केली आहे. 
       गुढीपाडव्या निमित्त जेष्ठ गायक काशिनाथ जाधव (बाबा) यांचे हस्ते स्टुडीओचे पुजन करण्यात आले.

या वेळी 'स्टार इव्हेंट'च्या प्रमुख ट्विंकल राजू भोसले यांनी सुचित्रा लोंढे यांना उपस्थित राहत  शुभेच्छा दिल्या तर वैभव जाधव, विभा जाधव, निकिता गायकवाड, रुपेश खरात, विजय कांबळे, वर्षा कांबळे, श्री जाधव आदी उपस्थित होते.
     उपस्थितांचे स्वागत सुचित्रा लोंढे यांनी करून आभारही व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement