Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


महानायक अमिताभ बच्चन हैदराबाद येथे शुटींग दरम्यान जखमी


मुंबई - संजय डुबल - बाॕलीवुड महानायक चित्रपट अभिनेते बीग बी अमिताभ बच्चन हैदराबाद येथे शूटिंगदरम्यान जखमी झाले.

 त्यांनी स्वतःच आपल्या ब्लॉगवर याची माहिती दिली आहे. 

अमिताभ बच्चन हे प्रभासच्या 'प्रोजेक्ट ए' या चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्यात एक अॕक्शन सीन करताना त्यांच्या बरगड्यांना इजा झाली. हैदराबादेतील उपचारानंतर त्यांना मुंबईला पाठवण्यात आले आहे.

अमिताभ बच्चन आपल्या ब्लॉगमध्ये म्हणाले - बरगडीच्या पिंजऱ्यातील स्नायू फाटले आहेत. शूटिंग रद्द करण्यात आली आहे. पट्टी बांधली असून, उपचार सुरू आहेत. खूप जास्त वेदना होत आहेत. हलण्यासही त्रास होत आहे. श्वास घेण्यासही त्रास होत आहे. या वेदना कमी करण्यासाठी मला काही औषधी देण्यात आलीत. यातून सावरण्यासाठी आणखी काही आठवडे लागतील.

बिग बी म्हणाले -'मी बरा होईपर्यंत सर्व कामे थांबवण्यात आली आहेत. मी जलसात विश्रांती घेत आहे. फक्त आवश्यक गोष्टींसाठी थोडेसे चालावे लागणार. 

मी जलसाच्या गेटवर माझ्या चाहत्यांना भेटू शकणार नाही, हे सांगणे माझ्यासाठी खूप कठीण आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement