Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन.बाॕलीवुडवर शोककळा...

मुंबई - संजय डुबल - प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं आज पहाटे निधन झालं. ते 66 वर्षाचे होते. 
  गंभीर भूमिका करणारा अभिनेता ते हास्य अभिनेता अशी सतीश कौशिक यांची ओळख होती. शिवाय ते दिग्दर्शकही होते आणि अनेक सिनेमांचे निर्मातेही होते. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
      सतिश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 मध्ये हरियाणाच्या महेंद्रगड येथे झाला. सतीश कौशिक यांनी दिल्लीच्या करोलबागमध्ये आपलं शिक्षण घेतलं. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या करोडीमल कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. 1978 मध्ये तिथून ते पास झाले. आणि त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात शिक्षण घेतलं.
   सतिश कौशिक यांनी आपल्या करीअरची सुरुवात 1983सामध्ये आलेल्या जाने भी दो यारो या सिनेमातून केली होती. त्यानंतर त्यांनी 100 हून अधिक सिनेमात काम केलं. 1993मध्ये त्यांनी रुप की रानी चोरों का राजा या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर त्यांनी अनेक सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. त् तसेच अनेक सिनेमांची निर्मिती केली. 
सतीश कौशिक यांचं वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी विविधभूमिका केल्या. मात्र, त्यांच्या विनोदी भूमिका अधिक गाजल्या.
सतीश कौशिक यांची मिस्टर इंडियातील भूमिका सर्वाधिक गाजली. त्यांना दोन वेळा बेस्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. अभिनेता गोविंदासोबतचा त्यांचा कॉमेडीचा टायमिंग अफलातून असायचा. त्यांच्या छोट्या भूमिकाही प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिल्या. त्यांचे निधना ने बाॕलीवुड ची मोठी हानी झाली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement