Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


आधार जनसेवा सामाजिक संस्था, पाटण, यांचे वतीने महिला दिनाचे आयोजन...महिलांचे सन्मानार्थ "विधवा महिलांना हळदी कुंकूवाचा मान देऊन करणार, त्यांचा सन्मान "

कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्रमुख मार्गदर्शक  -  मा. सौ. प्राची पाटील, (संस्थापिका अध्यक्षा -प्राना फौंडेशन.)
पाटणः संजय डुबलः- पतीच्या निधनानंंतर पत्नीचे  कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसुत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे, यासारख्या प्रथांचे आजही पालन केले जाते. पुरोगामी विचार सरणीच्या महाराष्ट्राला हे भूषणावह नाही .
विधवा महिलांना इतर महिलां प्रमाणे सन्मानाने राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. समाजात  अजुनही 'विधवा' प्रथांचे पालन होत असल्याने, या प्रथांचे निर्मुलन होणे ही काळाची गरज आहे. भविष्यात विधवा प्रथा बंद व्हाव्यात,
विधवा सन्मानाने रहाव्यात, त्यांच्यात अपराधीपणाची भावना, भिती आणि न्यूनगंड राहणार नाही .त्यांना आयुष्यभर धार्मिक, सामाजिक तसेच कौटुंबिक कार्यक्रमात सहभाग घेता यावा. यासाठी आधार जनसेवा सामाजिक संस्थेने  कृतीशील पाऊल असुन 
"पाटण शहरातील विधवा महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ " संस्थेच्या वतीने आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या 
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी - डाॕ.सौ.प्राची पाटील, (संस्थापक अध्यक्षा प्राना फौंडेशन) स्रियांचे समाजातील स्थान, या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर दुसऱ्या 
प्रमुख पाहुण्या-  डाॕ.सौ.जयश्री पाटील
विषयः स्रियांचे आरोग्य. या विषयावर मार्गदर्शन करतील.
    तसेच सौ.भावना फाटक, सौ. संजीवनी खांडके, सौ.वैशाली खैरमोडे, सौ जयश्री गायकवाड आदींच्या प्रमुख उपस्थितीत, महिला दिन, मंगळवार दि.७ मार्च रोजी दु.३वा. स्वामी मंदिर पाटण, येथे संपन्न होत आहे. 
    'महिला दिनी' महिलांचे सन्मानार्थ या कार्यक्रमास बहुसंख्य महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन, आधार जनसेवा सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement