Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


|| शीघ्रकवी ची नवी सुरुवात || जमवा सेवा प्रतिष्ठान ची सुरवात. नाटककार सु.बा.सरपडवळ यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

.     
यावेळी 'तिच काय चुकलं' या नाटकाचे लेखक दिग्दर्शक अभिनेते सु.बा सरपडवळ यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 
मुंबई - संजय डुबल.-  || शीघ्रकवी ची नवी सुरुवात ||
            श्री स्वामी समर्थ मठ, गोशाळा, वृद्धाश्रम ( पेण /पनवेल ) येथे नियोजित वास्तू उभारणी निम्मीत " श्री. स्वामी समर्थ " सेवक - सेविकांचे   'जमवा सेवा प्रतिष्ठान' मुंबई महाराष्ट्र ( रजिस्टर ) या संस्थेची सुरुवात मुंबईतील परेल च्या दामोदर हॉल येथे रविवार दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता समारंभ आयोजित करण्यात आला होता. मनोरंजनासाठी हिराकांत कनगुटकर लिखित व प्रकाश लाड दिग्दर्शित रत्नलेखा निर्मित " कन्या ही सासुराशी जाये " हे जुन्या जमान्यातील नाटक स्वामी भक्त, शीघ्रकवी - जगदीश वासावे यांनी सादर केले होते. नाटकाच्या उत्तम सादरीकरणाने बहुगर्दीत रसिकांची मन जिंकली.
    "जमवा सेवा प्रतिष्ठान" ( मुंबई ) या संस्थेच्या वतीने नाटकाच्या मध्यांतरात श्री. स्वामी समर्थ भक्त श्री. जगदीश महादेव वासावे            (शीघ्रकवी ) यांच्या हस्ते अनेक स्वामी सेवक आणि कामगार रंगभूमीवरील जेष्ठ नाट्य दिग्दर्शक श्री. राम सारंग तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाटककार - श्री. सु.बा.सरपडवळ यांच्या " तिचं काय चुकलं ? " या सर्वोत्तम नाटका साठी लेखक /दिग्दर्शक  , अभिनेता म्हणून ' सरपडवळ ' यांना सन्मानपूर्वक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले!
        सर्वोत्कृष्ठ नाटक तिचं काय चुकलं ? तील एक प्रसंग.
 स्वामी भक्त अशोक चव्हाण, प्रल्हाद हरचकर, दिपक नाटेकर, एकनाथ आंबेरकर,सौ. श्रध्दा भाटकर (प्रसिद्ध अभिनेता मालवणी सम्राट - मच्छिंद्र कांबळी यांची भाची) आणि श्री. स्वामी समर्थ सेवक - सेविकांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळून समारंभ साकार करण्यासाठी आतोनात प्रयत्न केले.
        सर्वोत्कृष्ठ नाटक तिचं काय चुकलं ? तील एक प्रसंग.
मधुमेहावरील रिझल्ट. माहीतीसाठी whts app करावे 9172830799 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement