Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात. २५ प्रवाशांचा दुर्देवी जळुन मृत्यु.

     बुलढाणा -संजय डुबल -  नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा समृध्दी महामार्गावर  मध्यरात्री भीषण अपघात झाला. पिंपळखुटा येथे बस डिव्हायडरवर आदळल्याने पलटी झाली. त्यानंतर या बसला भीषण आग लागली. या आगीत बसमधील 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण झाला की मृतांची ओळखही पटणं देखील मुश्किल झालं आहे.
    या बाबत सविस्तर माहिती अशी की विदर्भ ट्रॅव्हल्सची नागपूरहून ही बस पुण्याकडे जात होती. मध्यरात्री 1 ते 1.30च्या सुमारास समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा येथे बस डिव्हायडरला धडकली. त्यामुळे बस पलटी झाली. बस पलटी झाल्याने दरवाजा तुटला. त्यामुळे प्रवाशांना दरवाजातून बाहेर पडणं मुश्किल झालं.
  तितक्यात बसने पेट घेतला. यावेळी प्रवाशांनी एकच टाहो फोडला. त्यातच आग लागल्याने प्रवाशांनी जीव वाचवण्यसााठी जीवाच्या आकांताने आक्रोश केला. पण त्यांना कुणीही वाचवू शकले नाही. पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण केलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी येऊन आग विझवली. 
        
       बसमध्ये 25 प्रवाशांचे मृतदेह पडलेले होते. सर्व मृतदेह जळालेले होते. अनेक मृतदेह अर्धवट अवस्थेत जळालेले होते. कुणाचाही मृतदेह ओळखता येत नव्हता.
     बस पलटी झाली तेव्हा चालक आणि काही प्रवाशांनी बसच्या खिडक्या फोडल्या आणि बसमधून बाहेर पडले. त्यामुळे एकूण 8 जणांचे प्राण वाचले आहेत. तर बाकीचे सर्व प्रवासी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
      बसचा अक्षरश: जळून कोळसा झाला आहे. बसच्या सर्वच सीट जळून खाक झाल्या आहेत. प्रवाशांचे सामानही जळून खाक झाल्याने काहीच उरलेलं नाही. रात्रीची वेळ असल्याने मदत कार्यात अडथळा येत होता.पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement