Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


जेष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी काळाच्या पडद्याआड.

मुंबई - संजय डुबल - भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळाची साक्षीदार असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना (दीदी)लाटकर यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झालं.
तब्बेत बिघडल्याने सुलोचना दीदी यांना आज  मुंबई दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
      सुलोचना लाटकर यांचा जन्म २० जुलै १९२८ रोजी झाला. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांचे लग्न झालं. सुलोचना यांना कांचन नावाची मुलगी आहे. कांचनने प्रसिद्ध मराठी अभिनेते काशिनाथ घाणेकर यांच्याशी लग्न केलं. सुलोचना यांना १९९९ मध्ये पद्मश्री आणि २००४ मध्ये फिल्मटाइम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.त्यांचे कारकिर्दीत जवळपास
२५० हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं
      
  त्या एक प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री देखील होत्या. त्यांनी २५० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आणि आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. 
     अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबत त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. मेरे जीवन साथी, कटी पतंग, प्रवेश आणि त्याग यासारख्या प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका केल्या
      सुलोचना दीदींच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर खून भरी मांग, आशा, कटी पतंग, जॉनी मेरा नाम, आदमी, देवर, कहानी किस्मत की, अब दिल्ली दूर नहीं, दिल देके देखो, बंदिनी, नई रोशनी, आदमी, जोहर महमूद इन गोवा आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. 
       मराठी मातीतील शालीनता, घरंदाज अभिनय आणि सोज्वळतेचा चेहरा म्हणजे सुलोचना दीदी होय.   
     १९४३ला हिंदी चित्रपट सृष्टीत सहकलाकार म्हणून पृथ्वीराज कपूर यांच्या बरोबर अभिनयाची सुरुवात करून पुढे राजकपूरशम्मीकपूरशशीकपूर या कपूर घराण्याच्या दुसऱ्या पिढीबरोबर आणि नंतर, कपूर घराण्याच्या तिसऱ्या पिढीच्या रणधीर कपूरऋषी कपूरगीता बालीबबितानीतू सिंग यांच्या बरोबरही त्यांनी हिंदी चित्रपटातील काळ गाजवला. २५०हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी आपल्या अभियानाची छाप पाडली. वहिनीच्या बांगड्यामीठलृ भाकरधाकटी जाऊ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.   
    सुलोचना दीदींचं मूळ नाव सुलोचना लाटकर. कोल्हापूरमधल्या खडकलाट गावी सुलोचना दीदींचा जन्म झाला.
       सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे           सुलोचना दीदी यांना पद्मश्री, तसेच महाराष्ट्र  भूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. 
      सुलोचना दीदींचं पार्थिव उद्या सकाळी ११ वाजल्या पासून अंत्यदर्शनासाठी त्यांच्या प्रभादेवी येथील निवासस्थानी ठेवण्यात येईल. त्यानंतर उद्या सोमवारी संध्याकाळी त्यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement