Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयना धरणात पोहायला गेलेला युवक बुडाला.


कोयना नगर - मित्रांसोबत कोयना धरणातील जलाशयात पोहायला गेलेला गाडखोप गावातील  अर्जुन शरद कदम वय 22 हा युवक जलाशयात बेपत्ता झाला आहे. 
      अर्जुन मित्रांसह कोयना धरणाचे जलाशयात बाजे येथील तीरावर पोहायला गेला होता. पोहत असताना तो तेथील गाळात अडकुन बेपत्ता झाला आहे. 
       बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध घेण्याचे कार्य रात्री उशीरा पर्यंत सुरू होते. युवक बुडाल्याने गाडखोप गावावर शोककळा पसरली आहे. 
      सदर घटनेची नोंद कोयनानगर पोलीस स्टेशनला झाली असुन. सहाय्यक पोलिस निरीक्षक नवनाथ गायकवाड अधिक तपास करीत आहेत. 
      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement