Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


राज्यस्तरीय बाॕक्सींग स्पर्धेत तनुश्री आंबोकर ने सुवर्ण पदकावर नाव कोरत बेस्ट बाॕक्सर सन्मानही प्राप्त केला आहे.

संजय डुबलआपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह नेटवर्क -  नागपुर येथे नुकत्याच पार पडलेल्या किशोरी गटात तनुश्री आंबोकर हिने राज्यस्तरीय बाॕक्सींग स्पर्धेत सुवर्ण पदकावर नाव कोरत बेस्ट बाॕक्सर सन्मानही प्राप्त केला आहे. 
   तर राज वामने ने रजत पदकावर आपले नाव कोरले. 
      दोघेही मुंबईतील प्रभादेवी विभागातील बाबा बाॕक्सींग क्लब चे विद्यार्थी असुन बाबा बाॕक्सींग क्लब चे प्रशिक्षक विवेक ठाकूर व ग्रँड मास्टर श्रीकृष्ण आजगावकर, योगेश मानकामे यांनी अभिनंदन केले.
    प्रशिक्षक विवेक ठाकूर यांचे मार्गदर्शना खाली 'बाबा बाॕक्सिंग क्लबच्या' अनेक विद्यार्थ्यांनी पदके मिळवून 'बाबा बाॕक्सींग क्लब'चे नाव उज्वल केले असुन अनेक  विद्यार्थ्यांनी पदके प्राप्त केलेली आहेत.
   अकोला येथे झालेल्या राज्यपातळी वरील बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये भव्य भूपेश  ठाकूर यांनी ब्राँझ मेडल मिळवले,
भुसावळ येथे झालेल्या राज्यपातळीवरील  बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये स्वर्णिम सिंग यांनी ब्राँझ मेडल मिळवले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement