Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


नाशिक जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत ६६ पाणी पुरवठा योजनांची कामे जलदगतीने पूर्ण करा - आमदार सत्यजीत तांबे.

नाशिक जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत ६६ पाणी पुरवठा योजनांची कामे जलदगतीने पूर्ण करा -  आमदार सत्यजीत तांबे.
 
वन विभागाची, जलसंपदा विभागाची जागा उपलब्ध नसल्याने सुरु झालेल्या नसून, त्याबाबत संबंधित विभागांकडून जागा उपलब्धतेबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर - पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली उत्तरात माहिती

                   आ. सत्यजीत तांबे
मुंबई -  संजय डुबल - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह -  नाशिक जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत ६६ पाणी पुरवठा योजनांची कामे जलदगतीने पूर्ण करण्याबाबत आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रश्न उपस्थित करुन विधानपरिषदेत सरकारचे लक्ष वेधले. नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने मंजूर कार्यारंभ आदेश दिलेल्या १ हजार २२२ योजनांपैकी अद्यापही ६६ योजनांच्या कामांना सुरुवात झाली नसून सदर योजनांसाठी निविदा प्रक्रिया राबवून कार्यारंभ आदेश देण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२२ असताना अद्यापही ६६ योजनांची कामे सुरू झाली नसल्याची बाब खरी आहे का? असा प्रश्न आ. तांबे विचारला. 
नाशिक जिल्हा परिषदेच्या २६ योजना ह्या वन विभागाची, जलसंपदा विभागाची जागा उपलब्ध नसल्याने सुरु झालेल्या नसून, त्याबाबत संबंधित विभागांकडून जागा उपलब्धतेबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. तसेच, वन विभागाकडे १० योजनांचे प्रस्ताव प्रलंबित असून, इतर योजनांच्या प्रस्तावांना वनविभागाची परवानगी मिळालेली आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आ. तांबे यांच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. 

जल जीवन मिशन योजनेतंर्गत कामांना वन, जलसंधारण, जलसंपदा विभागामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचे संबंधित विभागाकडे स्थानिकांच्या मदतीने जिल्हा परिषद स्तरावरून पाठपुरावा
करण्याचा दृष्टीने कोणती कार्यवाही करण्यात येत आहे, सदर ६६ योजना सुरू होण्यास प्रामुख्याने वनविभागाकडून जलस्रोतासाठी अथवा जलवाहिनी टाकण्यासाठी ना हरकत दाखला अद्याप प्राप्त झाला नाही, हे खरे आहे का?
वाढीव खर्चासह असलेला सुधारित प्रस्ताव दाखल करुन मान्यता घेण्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही करण्यात आली? असे प्रश्न आ. तांबे यांनी उपस्थित केले. 
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तरात माहिती दिली की, ज्या योजनांना  पाण्याची आवक कमी आहेत अशा ठिकाणी नवीन प्रस्ताव करुन सुधारित अंदाजपत्रकास मान्यता देण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. पाणी पुरवठा योजनांची कामे करण्यासाठी पुर्णवेळ कार्यकारी अभियंता उपलब्ध नाही. परंतु, पुर्णवेळ कार्यकारी अभियंता उपलब्ध नसल्यामुळे पाणी पुरवठा योजनांची कामे प्रलंबित नाहीत, असे त्यांनी उत्तरात स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement