Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


२४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू . यात 12 बालकांचा समावेश, नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण सरकारी रुग्णालयाती धक्कादायक प्रकार...

      
नांदेड :संजय डुबल - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह:- नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण सरकारी रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे.  नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गंभीर बाब म्हणजे १२ नवजात बालकांचा यात समावेश आहे. यामध्ये ६ मुलं तर६ मुली आहेत. तर, इतर१२जण प्रौढ आहेत. यात सर्पदंश आणि विषबाधेमुळे १२ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.      नांदेडमधल्या या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे पुन्हा वेशीवर टांगली गेली आहे.           
    गेल्या २४ तासांत २४ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी 
नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता एस आर वाकोडे यांनी सांगितले की, या रुग्णालयात प्रामुख्याने सर्पदंश झालेले रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येत असतात. सर्प दंशावर उपचार करण्यासाठी मुंबईच्या हाफकिन संस्थेच्या माध्यमातून सर्पदंशावरील औषध मागवली जातात. सध्या काही प्रमाणात येथे सर्पदंशावरील औषधांची कमतरता आहे. मोठ्या संख्येने रुग्ण येथे उपचारासाठी येथे येत असल्याने रुग्णालयावर ताण असल्याचा खुलासा यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement