Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


दोन पॕसेंजर रेल्वेंची समोरा समोर धडक. 6 प्रवासी ठार, तर 16 प्रवासी जखमी.


 

 

 दोन पॕसेंजर मध्ये समोरासमोर धडक. 6 ठार 16 जखमी. 

 आंध्र प्रदेश - संजय डुबल - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह - आंध्र प्रदेश येथील विजियानगरम येथे रेल्वे अपघात झाला.  दोन रैल्वे गाड्यांमध्ये टक्कर झाली असून, त्यामुळे पॅसेंजर ट्रेनच्या तीन बोगी रुळावरून घसरल्या आहेत.  या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 18 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. 
       मिळालेल्या माहितीनुसार, विशाखाहून रायगडाकडे जाणाऱ्या रेल्वेचे डबे कोठावलसा (एम) अलमंडा-कंटकपल्ली येथे रुळावरून घसरले.  जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.  दरम्यान, घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.  विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेन (08532)  आणि विशाखापट्टणम-रगडा पॅसेंजर (08504 )ट्रेनमध्ये टक्कर झाली आहे.  या अपघातात 3 डब्यांचे नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफला माहिती देण्यात आली आहे.  घटनास्थळी पोहोचलेले अधिकारी मदतकार्यात व्यस्त आहेत.
       विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात निवारण गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.  तर रेल्वे बोर्ड ग्रुपमधील डीआरएम सौरभ प्रसाद यांनी रेल्वे अपघाताची माहिती दिली आहे.  रुळावरून घसरल्याच्या घटनेचा तपशील गोळा केला जात आहे.  बचाव पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाल्याचे डीआरएम यांनी सांगितले.  या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.  गाड्यांच्या धडकेमुळे घटनास्थळी विजेच्या तारा तुटल्या.  त्यामुळे परिसरात अंधार झाला.  रात्र असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत.  मात्र, पूर्व मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार काही प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे, मात्र अद्याप या आकडेवारीला दुजोरा मिळालेला नाही.  अपघाताचे वृत्त समजताच मुख्यमंत्र्यांनी सर्व जखमी प्रवाशांवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement