Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


पाटण येथे बुधवारी लिलावती निकम इनडोअर स्टेडियम व लेदर बॉलिंग मशीनचा उद्घाटन सोहळा प्रांताधिकारी सुनील गाढे यांचेसह विविध मान्यवरांची विशेष उपस्थिती...

पाटण येथे बुधवारी लिलावती निकम इनडोअर स्टेडियम व लेदर बॉलिंग मशीनचा उद्घाटन सोहळा...

प्रांताधिकारी सुनील गाढे यांचेसह विविध मान्यवरांची विशेष उपस्थिती

पाटण, - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह -   (चंद्रकांत सुतार) : पाटण येथे शिव सक्षम प्रतिष्ठान संचलित निकम स्पोर्टस् क्लबचा पाचवा वर्धापन दिन व लिलावती निकम इनडोअर स्टेडियम व लेदर बॉलिंग मशीनचा उदघाटन सोहळा 8 नोव्हेंबर रोजी प्रातांधिकारी सुनील गाढे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती शिव सक्षम प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रहार निकम व निकम स्पोर्ट्स क्लब चे व्यवस्थापकीय संचालक चंद्रगुप्त निकम यांनी दिली. 
    उदघाटन सोहळ्यास तहसीलदार रमेश पाटील, पोलीस उपअधीक्षक विवेक लावंड, पोलीस निरीक्षक विकास पाडळे, चिन्मय एरम, कमलेश पिसाळ हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ग्रामीण भागातील अनेक खेळाडूची NSC येथे प्रशिक्षण घेऊन विविध वयोगटात यापूर्वी जिल्हा/राज्य स्तरावर निवड झालेली आहे. 
     यातून प्रेरणा घेऊन NSC ने ग्रामीण भागातील खेळाडूना अत्याधुनिक प्रशिक्षण मिळावे आणि पावसाळ्यात सुद्धा प्रशिक्षण सुरु रहावे यासाठी ५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून लिलावती निकम इनडोअर स्टेडियम व लेदर बॉलिंग मशीनचा उदघाटन सोहळा आयोजित केला आहे. तरी पाटण व परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement