Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


अशोक शिंदे यांच्या 'सूफी तरंग’ला मराठा मंदिरचा संशोधनात्मक साहित्य पुरस्कार

अशोक शिंदे यांच्या 'सूफी तरंग’ला मराठा मंदिरचा संशोधनात्मक साहित्य पुरस्कार

मुंबई -आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - (गणेश तळेकर ) : मराठा मंदिर संस्थेचा यंदाचा प्रतिष्ठेचा संशोधनात्मक साहित्य पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अशोक शिंदे यांच्या 'सूफी तरंग’ या पुस्तकाला प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव आणि भारताचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिरच्या वास्तूत झालेल्या शानदार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी साहित्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
हजरत अल्हाज ख्वाजा मजिदूल हसन शहा हसनी यांच्या मानवतावादी मजिदिया पंथाच्या प्रेरणेतून साकारलेल्या या पुस्तकासाठी सूफी फैजुल हसन शहा मजिदी यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. सूफी पंथाचा उदय, गुरुभक्तीचे मार्ग, सूफी विचारधारा, विविध सूफी संप्रदाय, जगभरातील आणि भारतातील सूफी संत, खानकाह (मठ, आश्रम), सूफी संगीत, हिंदू आणि सर्वधर्मीयांशी असलेले आपुलकीचे नाते, श्रद्धास्थाने, याकूब बाबांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांची असलेली श्रद्धा आदी विविद मुद्यांचा परामर्श यात घेण्यात आला आहे. त्यासाठी जगभरातील अनेक संदर्भ ग्रंथांचा तसेच प्रत्यक्षात चर्चेतून उलगडलेल्या अनेक मुद्यांना अशोक शिंदे यांनी शब्दबद्ध केले आहे.
                                जाहिरात 
                                  जाहिरात 
                                  जाहिरात 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement