Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी यांचे निधन.. आज सायंकाळी सहा वाजता कराड येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कराड - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी  तसेच सारंग पाटील यांच्या मातोश्री रजनीदेवी श्रीनिवास पाटील यांचे शुक्रवारी (दि.12 जानेवारी) अल्पशा आजाराने निधन झाले. रजनीदेवी पाटील या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या.

       त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  त्यांचे पार्थिवावर आज सायंकाळी सहा वाजता कराड येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह परिवारा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement