Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


आखिल भारतीय नाट्य परिषदे तर्फे गणेश तळेकर यांचा लीला मेहता पुरस्कृत भार्गवराव पांगे कार्यकर्ता पुरस्काराने सन्मान...

आखिल भारतीय नाट्य परिषदे तर्फे गणेश तळेकर यांचा लीला मेहता पुरस्कृत भार्गवराव पांगे कार्यकर्ता पुरस्काराने सन्मान...


मुंबई : आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह (संजय डुबल ):- लेखक दिग्दर्शक पत्रकार गणेश तळेकर यांना आखिल भारतीय नाट्य परिषदे तर्फे लीला मेहता पुरस्कृत भार्गवराव पांगे कार्यकर्ता पुरस्कार' मध्यवर्ती, मुंबई कार्यालयात निस्वार्थीपणे कार्य केल्याबद्दल शुक्रवार, दिनांक : १४ जून २०२४ रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार महाराष्ट्राचे अत्यंत लाडके अभिनेते महाराष्ट्र भूषण श्री अशोक सराफ सर आणि दिग्गज दिग्दर्शक व शंभराव्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल सर यांच्या हस्ते देण्यात आला.

  गणेश तळेकर गेली अनेक वर्षे  नाट्य क्षेत्रात काम करत असताना नाट्य व्यवस्थापक म्हणूनही आपली जबाबदारी समर्थ पणे पेलत आहेत. ते अनेक इव्हेंट करत आले आहेत, ते रंगभूमी ची निस्वार्थीपणे सेवा करत असल्याने त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख मा. शरद पवार,  उद्योग मंत्री उदय सामंत,  मा. प्रभू,  जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, दिग्गज अभिनेते निर्माते व नात्यापरिषदेचे अध्यक्ष श्री. प्रशांत दामले, मा.अशोक हांडे, माजी नाटय परिषद अध्यक्ष अभिनेते,  मोहन जोशी,मा सतीश लोटके, मा शिवाजी शिंदे, नाट्य परिषदेचे पदाधिकारी व सभासद या वेळी उपस्थित होते, 

या वेळी आपली भावना व्यक्त करताना गणेश तळेकर मुलाखती वेळी म्हणाले की अखिल भारतीय नाट्य परिषदेचा मी मनापासून आभारी आहे, त्याचप्रमाणे सर्व सहकलाकार तंत्रज्ञ व बॅकस्टेजच्या संपूर्ण टीमचा मी अत्यंत ऋणी आहे.या सर्वांचे सहकार्यामुळे मला हा पुरस्कार  मला मिळाला आहे. पुरस्कार मिळणे ही आपल्या कामाची पावती तर आहेच, पण त्याचबरोबर जबाबदारीची जाणीवही करून देते. त्यामुळें मी यापुढे मी रंगभूमीची सेवा करताना अशाच चांगल्या प्रकारे काम करत राहण्याचा मी मनापासून आयुष्यभर प्रयत्न करत राहीन. त्यानीं असे सांगीतले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement