Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


मयुरेश पेम अखिल भारतीय नाट्य परिषदे कडून सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता पुरस्काराने सन्मानित

मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - (संजय डुबल )
अखिल भारतीय नाट्य परिषदे कडून मयुरेश पेम यास
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता" हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यानिमित्ताने मयुरेश पेम ने आपले मनोगत व्यक्त केले ते असे...
नमस्कार मी मयुरेश पेम. आमच्या ऑल द बेस्ट नाटकाला रसिक मायबापांनी तुफान रिस्पॉन्स दिला आहे. नाटकाचे प्रयोग धुमधडाक्यात सुरू आहेत. माझं काम आवडलं खूप आवडलं असं प्रयोगानंतर रसिक मायबाप सांगतात तेव्हा खूप आनंद होतो. या आनंदात आणखीन एक भर पडली आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा व्यावसायिक नाटक 2024 "सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता" हा पुरस्कार मला ऑल द बेस्ट नाटकासाठी मिळाला आहे. हा पुरस्कार माझे अत्यंत लाडके अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर आणि दिग्गज दिग्दर्शक व शंभराव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल सर यांच्या हस्ते मला मिळाल्याने आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आहे. त्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना खूप भारावून गेलो. महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय शरद पवार साहेब.. उद्योग मंत्री उदय सामंत साहेब.. माननीय शशी प्रभू साहेब.. दिग्गज अभिनेते निर्माते व अध्यक्ष प्रशांत दामले सर, अशोक हांडे सर, आणि नाटक अखिल भारतीय नाट्य परिषदेचे मी मनापासून आभार मानतो. तसेच ऑल द बेस्ट नाटकाचे लेखक दिग्दर्शक माझे बाबा देवेंद्र पेम सर व ऑल द बेस्ट चे सर्व सहकलाकार तंत्रज्ञ व बॅकस्टेजच्या संपूर्ण टीमचा मी अत्यंत ऋणी आहे. या साऱ्यांमुळे.. त्यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळेच मला हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळणे ही आपल्या कामाची पावती तर असतेच पण त्याचबरोबर जबाबदारीची जाणीवही करून देते. यापुढे मी रंगभूमीची सेवा करताना अशाच चांगल्या भूमिका करत राहण्याचा आणि रसिक मायबापांचं मनोरंजन करण्याचा मनापासून आयुष्यभर प्रयत्न करत राहीन. पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि खूप खूप प्रेम. ऑल द बेस्ट नाटक बघायला नक्की या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement