Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


ईटीव्ही नेटवर्कचे प्रमुख आणि रामोजीग्रुपचे अध्यक्ष रामोजी राव (वय ८८) यांचे आज पहाटे निधन झाले.

ईटीव्ही नेटवर्कचे प्रमुख आणि रामोजी ग्रुपचे अध्यक्ष रामोजी राव (वय ८८) यांचे आज पहाटे निधन झाले.

मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह (संजय डुबल )-
 ईनाडू आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे आज सकाळी हैदराबाद तेलंगणा येथे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले.  रामोजी राव यांचा हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पहाटे ३.४५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

      रामोजी राव हे रामोजी ग्रुपचे अध्यक्ष होते.  ते तेलगू भाषेतील सर्वात मोठ्या प्रसारित दैनिकांपैकी एक असलेल्या ईनाडू न्यूज पेपरचे प्रमुख होते.  2016 मध्ये, रामोजी यांना पत्रकारिता, साहित्य आणि शिक्षणातील योगदानाबद्दल, देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. 

     ईटीव्ही नेटवर्क व्यतिरिक्त, त्यांनी उषाकिरण मुव्हीज या निर्मिती संस्थेचे नेतृत्व केले.त्यांनी सुमारे 50 चित्रपट आणि टेलिफिल्म बनवले.  त्यांना एक राष्ट्रीय पुरस्कार आणि दोन फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले.  रामोजी फिल्म सिटी हैदराबादमध्ये शेकडो एकरमध्ये पसरलेली आहे, जिथे आतापर्यंत हजारो चित्रपटांचे शूटिंग झाले आहे.

रामोजी राव यांनी देशात प्रथमच मराठीसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये एकाचवेळी इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांची सुरुवात केली. त्यांनी विविध राज्यांतील प्रेक्षकांसाठी स्थानिक भाषेत भाषा बातम्या आणि मनोजरंज उपलब्ध करून दिली. विविध राज्यांतील पत्रकार आणि कलाकारांना प्रतिभेसाठी नवीन व्यासपीठ मिळालं. 

 ईटीव्ही मराठी, ईटीव्ही कन्नड, ईटीव्ही तेलुगु, ईटीव्ही गुजराती अशा प्रादेशिक भाषांतील टीव्हीवरील दर्जेदार कार्यक्रम आणि बातम्यांना प्रेक्षकांनी प्रचंड पसंती मिळाली.

रामोजी राव यांनी ऑगस्ट 1995 मध्ये तेलुगू प्रेक्षकांसाठी ईटीव्ही ही वाहिनी लाँच केली. ईटीव्हीनं अल्पावधीतच राष्ट्रीय स्तरावर आपले नेटवर्क वाढवत 13 भाषांमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया लाँच केले. त्यांचे निधन झाल्याने देशभरातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement