Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयना धरण अपडेट... कोयना धरणातील पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा..

कोयना धरण अपडेट 

कोयनानगर:आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह (संजय डुबल ) 

दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५ वा. धरणामध्ये एकूण ८६.१९ टीएमसी ८१.८४  % पाणीसाठा झाला आहे.
                 कोयना धरण : संग्राहीत छायाचित्र 
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असून पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी व रविवारी अति मुसळधार पावसाची (रेड अलर्ट) शक्यता वर्तविली आहे. या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त येव्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढविणे आवश्यक आहे.

सद्यस्थितीत सांडव्यावरून ४०,००० क्यूसेक्स विसर्ग चालू आहे. उद्या दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा. सांडव्यावरून सोडणेत आलेल्या विसर्गात वाढ करून ५०,००० क्युसेक्स विसर्ग सोडणेत येणार आहे.* तसेच येव्यानुसार त्यामध्ये वाढ करणेत येईल.

धरण पायथा विद्युत गृहामधील २१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ५२,१०० क्युसेक्स असेल.

कोयना/कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.

कोयना धरण...

 दिनांक: ०२/०८/२०२४
 वेळ: सकाळी 08:00
 पाण्याची पातळी: 2148'07'' (654.888 मी) 
 
 धरण साठवण:
 एकूण: 86.63 TMC (82.31%)
 थेट: 81.51 TMC (81.40%)

 आवक : 52,834 क्युसेक.

 डिस्चार्ज
 रेडियल गेट: 40,000 क्युसेक.
 KDPH: 2100 क्युसेक.

 कोयना नदीत एकूण विसर्ग: ४२,१०० क्युसेक

 मिमी मध्ये पाऊस- (दैनिक/संचयी) 
 कोयना- 96/3859
 नवजा- 131/4567
 महाबळेश्वर- 135/4233

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement