Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


जेष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन...नाट्य - चित्रपट क्षेत्रावर शोककळा... कर्करोगाने झाले निधन...

मुंबई : आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज १० ऑगस्ट रोजी पहाटे निधन झाले. आज सकाळी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते ६७ वर्षांचे होत्ते. 

    ते 1980 आणि 90 च्या दशकात प्रचंड लोकप्रिय होते.  ते अष्टपैलू अभिनय क्षमतेसाठी ओळखले जात.  त्यानी गंभीर भूमिकां प्रमाणेच विनोदी भूमिकाही तितक्याच ताकतीने सकारल्या.

   आपल्या अभिनय कारकिर्दीला थिएटरमधून सुरुवात केली होती.  त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये काम केले.   विजय कदम यांनी 'विच्छ माझी पुरी करा' हे लोकनाट्य', 'व खुमखुमी' हे कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. रथचक्र’, ‘टुरटूर’ सही दे सही' ही नाटकें त्यांची खूप गाजली. विजय कदम यांनी 1980 च्या दशकात चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका करून प्रेक्षकांची खूप प्रशंसा मिळवली.  ‘चश्मे बहादूर’, ‘पोलिसलाइन’, ‘हलद रुसली कुंकू हसलं ’ आणि ‘आमी दोघ राजा रानी’ हे त्यांचे चित्रपट खूप गाजले.  या अभिनेत्याच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे. 

  विजय कदम गेल्या दीड वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते.  मात्र, आज सकाळी त्यांची प्राणजोत मावळली.

   अभिनेते विजय कदम यांच्या पार्थिवावर आज रात्री उशिरा अंधेरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement