Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


व्यावसायिक बालनाट्यास अनुदान देण्यास सांस्कृतिक मंत्री अनुकूल...बालरंगभूमी परिषदेच्या विविध मागण्या मान्य...


व्यवसायिक बालनाट्यास अनुदान देण्यास सांस्कृतिक मंत्री अनुकूल...

बालरंगभूमी परिषदेच्या विविध मागण्या मान्य...

मुंबई -आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ( संजय डुबल ) व्यवसायिक प्रौढ नाटक, प्रायोगिक नाटक,संगीत नाटकाप्रमाणे 'व्यवसायिक बालनाट्या'ला अनुदान मिळावे ही अनेक वर्षांची मागणी होती. ती मान्य करण्यास सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अनुकूलता दर्शविली .
       या बाबत त्यांनी "बालरंगभूमी परिषदे'ला योजनेचे प्रारूप बनविण्यास आणि सांस्कृतिक विभागाला सादर करण्यास सांगितले आहे.
       'बालनाट्य संस्थां'च्या विविध अडचणी,समस्या,प्रश्न मांडण्यासाठी 'बालरंगभूमी परिषदे'च्या शिष्टमंडळाने ॲड नीलमताई शिर्के सामंत यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक कार्यमंत्री यांची  नुकतीच भेट घेतली.
याप्रसंगी 'राज्य बालनाट्य स्पर्धे'संबंधी अनेक सूचना परिषदेने केल्या.
     बालनाट्य स्पर्धेची केंद्रे, तारखा, अंतिम प्रवेशांचे निकष, मुलांच्या पुरस्कारांची संख्या आणि रक्कम वाढवणे, बालनाट्य सेन्सॉर सर्टिफिकेट,परीक्षक,स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक गटात घेणे...आदी विषयांवर केलेल्या सर्व सूचनांबाबत विचार करून निर्णय घेण्याची सकारात्मकता संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दर्शवली.
दरवर्षी 'बालनाट्य संमेलन' घेण्यास आणि त्यासाठी तशी तरतूद करण्यास ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सहमती दर्शविली.
'बालरंगभूमी परिषदे'ने केलेल्या सर्व मागण्या,सूचनांचे सारासार विचार करून अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सांस्कृतिक मंत्र्यांनी 'बालरंगभूमी परिषदे'च्या शिष्टमंडळास दिले.
या शिष्टमंडळात राजू तुलालवार (मुंबई), शैलेश गोजमगुंडे (लातूर),दीपा क्षीरसागर (बीड),सतिश लोटके (नगर),दीपक रेगे,दिपाली शिर्के(पुणे),योगेश शुक्ल (जळगांव) ह्या सदस्यांनी "बालरंगभूमी परिषदे' तर्फे चर्चेत सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement