महामानव भागोजी कीर यांचा जीवनपट उलगडताना...
मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - (गणेश तळेकर ) दि.२१.- रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे प्रेरणा, कार्तिकनची प्रतिज्ञा व जीवनाच्या लाटांवर या तीन पुस्तकांचे प्रकाशन साहित्यिक, नाटककार व आपल्या अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे विश्वस्त प्रा. डॉ. प्रदीपजी ढवळ यांच्या शुभहस्ते झाले.

चिपळूणचे भूमिपुत्र व गरिबीतून उद्योजक झालेले तसेच जीवनाच्या लाटांवरचे लेखक श्री. कृष्णकुमार काणेकर यांचे कौतुक करतानाच त्यांनी ओजस्वी वाणीतून महामानव भागोजी कीर यांचा गरिबीतून सुरू झालेला प्रवास, मॅनेजमेंट गुरुपर्यंत कसा पोहचला हे उलगडून सांगितले. श्रोते मंत्रमुग्ध होऊन भागोजीशेठ कीरांच्या कर्तुत्वाला उस्फूर्त दात देत होते.* ह्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. सर नेहमीच त्यांच्या व्याख्यानातून भागोजीशेठ कीरांचा उल्लेख करून तरुणाईला प्रेरणा देत असतात.
Advt.

प्रकाश कांबळी - मुख्यसाचिव,अभाभंस महासंघ
0 टिप्पण्या