'दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे 'चा थिएटरमध्ये सलग एकोणतीस वर्षांचा विक्रमी प्रवास...
ADVT.
मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर न्यू एक्सलसियर येथे दिवसा तीन खेळ याप्रमाणे या चित्रपटाने खणखणीत पन्नास आठवड्यांचा मुक्काम केला आणि मग तो मराठा मंदिर चित्रपटगृहात मॅटीनी शोला शिफ्ट केला आणि आजही तो सुरु आहे हे विशेषच आहे. अशा पध्दतीने एकाद्या चित्रपटाने चित्रपटगृहातच दीर्घकालीन मुक्काम करणे हे जगभरातील पहिले उदाहरण आहे. आणि हा एक मोठा आणि महत्त्वाचा विक्रमच आहे. पारंपारिक मनोरंजक हिंदी चित्रपटाने तो साध्य केला आहे.
ADVT.
विशेष म्हणजे १९९५ हे यशराज फिल्म बॅनरचे पंचवीसावे वर्ष होते. या चित्रपटाचे लेखन आदित्य चोप्रा आणि जावेद सिद्दीकीने केले आहे. गीते आनंद बक्षी यांची असून संगीत जतिन ललितचे आहे. या चित्रपटात शाहरूख खान, काजोल, अनुपम खेर, फरिदा जलाल आणि अमरिश पुरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच मंदिरा बेदी, पूजा रुपरेल, परमीत सेठी, अचला सचदेव तसेच करण जोहर इत्यादींच्याही भूमिका आहेत.
तुझे देखा तो ये जाना सनम, रुक जा ओ जानेवाली, मेहंदी लगा के रखना, घर आया परदेसी, मेरे ख्वाबो मे वो आए, जरा झुम लू मे, हो गया है तुमसे ही सगळी गाणी आजही लोकप्रिय आहेत. रसिकांच्या दोन पिढ्या ओलांडूनही हा चित्रपट आपले अस्तित्व टिकवून आहे, तजेलदार आहे यातच त्याचे यश आहे.
संपादक
संजय डुबल 9172830799


0 टिप्पण्या