Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


मिशन अयोध्या " संगीत प्रमोशनाच्या निमित्ताने.....

.                          " मिशन अयोध्या "
                   संगीत प्रमोशनाच्या निमित्ताने.....   
 
                     मी मराठी  ! अभिजात मराठी  !
 .                   लाभले भाग्य बोलतो मराठी  ! 
                    मी मराठी! अभिजात मराठी  ! 
                    लाभले भाग्य बोलतो मराठी......     
      ज्येष्ठ अभिनेते - सतिश पुळेकर यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करताना डावीकडे नाट्यसमीक्षक - सु. बा. सरपडवळ व उजवीकडे रंगकर्मी, पत्रकार - संजय डुबल......     
    मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह -  " मिशन अयोध्या " हा मराठी भव्य चित्रपट याचे भक्ती संगीत लॉंचिंग सोहळ्यात उपस्थितीत असलेले ज्येष्ठ अभिनेते - सतिश पुळेकर यांना " बाळगंगा पडवणे श्रमसंघ "( भंडारी बंधूभाव ) च्या वतीने सतिश पुळेकर यांना सन्मानपूर्वक पुष्पगुच्छ देताना नाट्यसमीक्षक - सु बा सरपडवळ व रंगकर्मी, पत्रकार- संजय डुबल आणि " जय भंडारी " ग्रुपचे भंडारी समुह उपस्थितीत होते  ! 
  " मिशन अयोध्या " हा उत्कृष्ट सोहळा, दादर - शिवाजी पार्क च्या मागच्या बाजूस समुद्र दिसेला - "  स्वतंत्रवीर सावरकर " सभागृहात रविवार दिनांक - २९ डिसेंबर २० २४ रोजी संध्याकाळी ०७ . ०० वाजता आयोजित करण्यात आला होता. 
      संपूर्ण सभागृहात गर्दी ने भरले होते आणि " मिशन अयोध्या " या येऊ घातलेल्या  मराठी चित्रपटतील नव्या जुन्या कलावंतांच्या उपस्थितीत ताल सुरातील भक्ती संगीत गीतांना रसिक प्रेक्षकांनी ठेका धरला होता टाल्या वाजवत वाजवत...... 
    सिनेदिग्दर्शक - समीर रमेश सुर्वे यांनी आपल्या मनोगतात म्हटले - "  मिशन अयोध्या " हा चित्रपट बनवने तसा सोपान्हवता पण आमचे निर्माता - कृष्णा दादाराव शिंदे यांनी माझ्या कडून करून घेतला हि  श्री.स्वामी समर्थ कृपा आणि श्रीरामांचा च आशिर्वाद म्हणावा लागेल ! 
       या सिनेमात प्रचंड वादंगातू अनेक वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर  श्री राममंदिर या नंतर काय❓ हा एक प्रश्न " मिशन अयोध्या " मध्ये प्रामुख्याने मांडण्यात आला आहे  ! 

      हा सिनेमा जानेवारी च्या दुसऱ्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे! तरी रसिक प्रेक्षकांनी सिनेगृहात हजेरी लावून "मिशन अयोध्या" पाहावा हि विनंती - सिनेदिग्दर्शक - समीर रमेश सुर्वे, संगीत गीतकार - एस. डी. राजगुरू / गायक - निलेश डहाणूकर, निर्मिती - कृष्णा दादाराव शिंदे व सौ. योगिता कृष्णा शिंदे आणि प्रसिध्द अभिनेते - सतिश पुळेकर यांनी आपपल्या भावना व्यक्त केल्या.... तेव्हा सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. 
      मंजिरी मराठे यांनी आपल्या गोड शब्दात सर्वांचे लक्ष आपल्या सुत्रसंचालनाच्या कौशल्याने वेधून घेतले होते !
                  -- सु बा सरपडवळ, समिक्षक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement