Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त जि प प्राथमिक शाळा रामापूर पाटण नं 2 बालसभा व विविध उपक्रमांचे आयोजन.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जि प प्राथमिक शाळा रामापूर पाटण नं 2 बालसभा व विविध उपक्रमांचे आयोजन.

आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - पाटण. प्रतिनिधी
चंद्रकांत सुतार :- आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जि प प्राथमिक शाळा क्रमांक 2 रामापूर पाटण येथे  बालसभा व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 रामापूर पाटण येथे सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव उत्साहात साजरा  करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्राबाई फुले यांच्या जीवनावर आधारित नाटक, गित व नृत्याचे सादरीकरण करून मनोरंजन तसेच विविध उपक्रमद्वारे सावित्रीबाई फुले याच्या जीवनाला उजाळा देण्यात आला,  विद्यार्थ्यांनी या वेळी आपली मनोगते ही व्यक्त केली.
   या बाल सभेचे सूत्रसंचालन स्वरा जयवंत कांबळे व आभार जुबेरिया तौसिफ गडकरी हिने मांडले. या प्रसंगी पालक तौसीफ गडकरी सर, सौ वर्षा जाधव, शिक्षक मार्गदर्शक श्री सुमित देसाई सर, पत्रकार चंद्रकांत सुतार, सौ वनिता माळी मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक महेश सूर्यवंशी व शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग आधी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement