पाटण - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - प्रतिनिधी (चंद्रकांत सुतार ) दि 16- जि प प्राथमिक शाळा रामापूर पाटण नं 2 येथे 'बालबाजार ' या उपक्रमाचे आयोजन दुपारी 12:00 ते 4:00 या वेळेत करण्यात आले होते.

या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. सुदर्शन काकासाहेब जाधव, सदस्या सौ. अनिसा मुदस्सर सातारकर, सौ.भाग्यश्री भरमानी शेलार, शिक्षक व पालक उपस्थित होते.

या बालबाजार उपक्रमांमध्ये इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी आपापल्या दुकानाचे नामफलकापासून तयारी केल्याने खरोखरच शाळेस आठवडी बाजाराचे स्वरूप आले होते.

या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या वस्तू विकताना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारीक ज्ञानाचेही धडे घेतले.काहीनी क्यू आर कोड द्वारा पैसे घेणे देणे इत्यादी व्यवहाराचे प्रात्यक्षिक घेतले. या बालबाजारमधील भाजीपाला, फळे, विविध खाद्यपदार्थांचे दुकाने हे सहभागी पालकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. या उपक्रमास पालक व विद्यार्थी यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचे उद्दिष्ट साध्य झाल्याने शाळेच्यावतीने शेवटी सर्वाचे आभार मानून 'बालबाजार ' या उपक्रमाची सांगता करण्यात आली.
0 टिप्पण्या