सोनचाफ्याची फुलं विकणारा मॅनेजमेंटगुरू,
हिंदू धर्मरक्षक भागोजीशेठ कीर!
हिंदू धर्मरक्षक- भागोजीशेठ श्रध्दायात्रा!!
सोनचाफ्याची फुलं विकणारे मॅनेजमेंट गुरू भागोजीशेठ कीर हे मुंबईत आणि मुंबई बाहेर अनेक बांधकाम क्षेत्रात यश प्राप्त झालेले हिंदू स्मशानभूमीचे आणि पतितपावन मंदिराचे प्रमुख जनक म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एकमेव.
धर्मरक्षक भागोजीशेठ सन्मान शोभायात्रा समस्त हिंदू धर्मातील ऐक्याचे प्रतिक म्हणून भागोजीशेठ यांना श्रध्दा व्यक्त करण्यासाठी एकत्र येऊन शोभायात्रा काढणार आहेत ! या शोभायात्रेच स्वरूप श्रध्दायात्रेत असेल असे अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष - श्री. नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी जाहीर पणे सांगितले!
हिंदू धर्मरक्षक भागोजीशेठ कीर! यांना अभिवादन करताना नाट्यसमीक्षक सु. बा. सरपडवळ
या श्रध्दायात्रेत अनेक नामवंत व्यक्तीन सोबत महाराष्ट्र राज्यातीलच नव्हे तर भारतातील अनेक राज्यातील हिंदू सामिल होणार आहेत असे सूत्रांकडून समजले!
या श्रध्दायात्रेत अभिवादन सभेचे आयोजन हिंदू धर्मरक्षक भागोजीशेठ कीर स्मृती समितीने निनंतीपुर्वक सर्वाना सामिल होऊन भागोजीशेठ जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी एकत्रित येऊन सामिल व्हा अशी विनंती केली आहे!
-- सु. बा. सरपडवळ


0 टिप्पण्या