महिलांनी एकमेकींच्या मैत्रिणी व्हा, वेळेवर आरोग्य तपासणी करा : डॉ. संगिता यादव...
शिवजयंती व उर्सानिमित्त मोफत आरोग्य शिबीरास प्रतिसाद...
शिवजयंती व उर्सानिमित्त पुणेवाले उर्स कमिटीने उर्सानिमित्त हजरत खलिल चिश्ती यांनी महिला आरोग्य मेळावा व मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती डॉ. संगिता यादव स्रीरोगतज्ञ, माऊली हॉस्पिटल, डॉ. नागेश्वर ननावरे, अनिता देवकांत नगराध्यक्षा, श्वेता वाघमारे तालुकाप्रमुख शिवसेना, तब्बेसुन शेख, अँड पाटील, नगरसेविका यांची होती.
डॉ. यादव यांनी बोलताना, मुलगा आणि मुलगी फरक करु नका. वयानुसार वाढ होत असताना अनेक बदल घडतात. तेरा ते चौदा वर्षांपासून अनेक बदल घडत असतात. मुलांच्या वाढीकडे दुर्लक्ष करु नका. अंतगत बदलांकडे लक्ष द्या. आपली मुलं
निरोगी असावीत.
हार्मोन्स बदल उघड दिसत नाही परंतु अंतर्गत बदलांकडे दुर्लक्ष करु नका. आताचा जमाना वेगवान आहे. अपुऱ्या वयात नको ते ज्ञान मिळत आहे. मोबाईल हा घातक आहे. ठराविक वेळेत ठराविक बदल घडले पाहिजे.
मासिक पाळीच्या बाबत अनेक समज गैरसमज आहेत. मुली वयात येताना लक्ष देणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या संपर्कात राहिले पाहिजे. बालपण, किशोरवयीन आणि प्रजनन कालावधी या स्तरातून आपणास जावे लागते. मासिक पाळी योग्य वयात आली पाहिजे आणि उशीरा ही येऊ नये. या गोष्टी वरती खीचे संपूर्ण आयुष्य अवलंबून असते.
अल्पवयीन मुलां मुलींची लग्न झाले तर पुन्हा मुल होण्यास त्रास सहन करावा लागता. लग्नाचे वय योग्य असावे. मुल होण्याची ही ठराविक वेळ असते.
महिला वर्ग आपल्या आरोग्यासाठी तक्रारी अंगावर काढतात. महिलांमध्ये अंगावरुन जाणे ही समस्या दिसून येते. याचा योग्य सल्ला आणि उपचार घेणे गरजेचे आहे. अंगावरून लाल पांढरे जाते हे सहसा कोणाला सांगत नाही. पाळीच्या
रक्तस्राव किती प्रमाणात असावा हे देखील तपासणे गरजेचे आहे. आपले पुढचे आयुष्य एका साध्या चुकीमुळे वाया जाऊ शकते.
महिलांना काही त्रास होत असेल तर वेळेत त्यावरती उपचार करुन घ्या. महिलांच्या तक्रारी दिवसभर न संपण्यासारख्या आहे. आपण मोकळे झाले पाहिजे. खुला संवाद साधून तक्रारीचे निराकरण करा आणि आपले आयुष्य सुंदर बनवा अस आवाहन यांनी केले.
अँड. पाटील यांनी बोलताना, महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेताना मनाच्या आरोग्याची ही काळजी घ्यावी. महिलांना अनेक कायदे नियम आहेत. आपल्या ला अधिकार प्राप्त आहे म्हणून त्याचा गैरवापर करु नका. महिलांनी किमाण थोडीफार कायद्याचे ज्ञान जाणून घ्या असे सांगितले.
सदर तपासणी व मोफत मार्गदर्शन शिबिरात अनेक महिलांनी लाभ घेतला. प्रत्येक महिलेच्या तक्रारीचे योग्य आणि समाधानकारक निराकरण याठिकाणी केले गेले.
पाटण सह परिसरातील आठशे नऊशे महिलांनी या तपासणी व सल्ला शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रम चे सुत्रसंचालन विद्या म्हासुर्णेकर यांनी मानले.


0 टिप्पण्या