शिवजयंतीनिमित्त शिवरत्न,समाजभूषण व जीवनगौरव पुरकाराचे  वितरण...

आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - पाटण ( प्रतिनिधी -चंद्रकांत सुतार ): शिवजयंतीनिमित्त ज्ञानसुर्य फाऊंडेशन व मैत्रीग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने भाग्यश्री मंगल कार्यालय ढेबेवाडी,ता.पाटण येथे रविवार दि.२३ रोजी दुपारी १२ वा. मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शिवरत्न पुरस्कार अनिल वीर यांना प्रदान करण्यात येणार आहे.     याशिवाय,समाजभूषण पुरस्कार आनंदा कांबळे (भाऊ) यांना तर जीवनगौरव पुरस्कार बाळासाहेब सातपुते (मामा) यांनाही वितरीत करण्यात येणार आहे.अशी माहिती अध्यक्ष, पदाधिकारी,समितीचे प्रमुख व निवड समितीने दिली आहे.