Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


३५ व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत असेन मी.. नसेन मी... नाटकाने पटकाविले रु. ७.५० लाखाचे प्रथम पारितोषिक...

सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी ही  कलाकारांचे अभिनंदन...

३५ व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत 
असेन मी.. नसेन मी... 
नाटकाने पटकाविले रु. ७.५० लाखाचे प्रथम पारितोषिक...

मुंबई: आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह (गणेश तळेकर ) :दि. १९ मे ३५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत 

स्क्रिप्टीज क्रिएशन्स या संस्थेच्या असेन मी.. नसेन मी... या नाटकासाठी रु. ७ लाख ५० हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. विभीषण चवरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे-

कलाकारखाना आणि शांताई या संस्थेच्या वरवरचे वधुवर या नाटकास रु. ४ लाख ५० हजाराचे द्वितीय पारितोषिक आणि सुमुख चित्र या संस्थेच्या उर्मिलायन या नाटकास रु. ३ लाखाचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

दिग्दर्शन :- प्रथम पारितोषिक (रु.१,५०,०००/-) अमृता सुभाष (नाटक- असेन मी.. नसेन मी...) द्वितीय पारितोषिक (रु.१,००,०००/-) अद्वैत दादरकर (नाटक- शिकायला गेलो एक) तृतीय पारितोषिक (रु.५०,०००/-) विराजस कुलकर्णी (नाटक- वरवरचे वधुवर)

नाट्यलेखन : प्रथम पारितोषिक (रु.१,००,०००/-) संदेश कुलकर्णी (नाटक- असेन मी.. नसेन मी...) द्वितीय पारितोषिक (रु.६०,०००/-) शेखर ढवळीकर (नाटक-नकळत सारे घडले) तृतीय पारितोषिक (रु.४०,०००/-) सुनिल हरिश्चंद्र व स्मिता दातार (नाटक- उर्मिलायन)

प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक (रु.४०,०००/-) प्रदीप मुळ्ये (नाटक- गोष्ट संयुक्त मानापमानाची) द्वितीय पारितोषिक (रु.३०,०००/-) शितल तळपदे (नाटक- मास्टर माईंड) तृतीय पारितोषिक (रु.२०,०००/-) चेतन ढवळे (नाटक- उर्मिलायन)

नेपथ्य : प्रथम पारितोषिक (रु.४०,०००/-) प्रदीप मुळ्ये (नाटक असेन मी.. नसेन मी...) द्वितीय पारितोषिक (रु.३०,०००/-) प्रदीप पाटील (नाटक- वरवरचे वधुवर) तृतीय पारितोषिक (रु.२०,०००/-) संदेश बेंद्रे (नाटक-ज्याची त्याची लव्हस्टोरी)

संगीत दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक (रु.४०,०००/-) निषाद गोलांबरे (नाटक-वरवरचे वधुवर)

द्वितीय पारितोषिक (रु.३०,०००/-) निनाद म्हैसाळकर (नाटक- उर्मिलायन) तृतीय पारितोषिक (रु.२०,०००/-) साकेत कानिटकर (नाटक असेन मी.. नसेन मी...)

वेशभूषा : प्रथम पारितोषिक (रु.४०,०००/-) मयुरा रानडे (नाटक गोष्ट संयुक्त मानापमानाची) द्वितीय पारितोषिक (रु.३०,०००/-) मंगल केंकरे (नाटक- सुर्याची पिल्ले) तृतीय पारितोषिक (रु.२०,०००/-) सुनिल हरिश्चंद्र (नाटक-उर्मिलायन)

रंगभूषा : प्रथम पारितोषिक (रु.४०,०००/-) उदयराज तांगडी (नाटक-उर्मिलायन) द्वितीय पारितोषिक (रु.३०,०००/-) राजेश परब (नाटक गोष्ट संयुक्त मानापमानाची)

तृतीय पारितोषिक (रु.२०,०००/-) सुरेंद्र चव्हाण व कौशल तांबे (नाटक असेन मी.. नसेन मी...)

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक व रु.५०,०००/-

पुरुष कलाकार प्रशांत दामले (नाटक- शिकायला गेलो एक), ऋषिकेश शेलार (नाटक- शिकायला गेलो एक), आनंद इंगळे (नाटक-नकळत सारे घडले), सुव्रत जोशी (नाटक- वरवरचे वधुवर), ओंकार राऊत (नाटक-थेट तुमच्या घरातून).

स्त्री कलाकार: निना कुलकर्णी (नाटक-असेन मी.. नसेन मी...), शुभांगी गोखले (नाटक- असेन मी.. नसेन मी...), निहारिका राजदत्त (नाटक-उर्मिलायन), सखी गोखले (नाटक- वरवरचे वधुवर), शर्मिला शिंदे (नाटक-ज्याची त्याची लव्हस्टोरी)

दि. ६ मे ते १६ मे, २०२५ या कालावधीत छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर, दादर (प), मुंबई या ठिकाणी अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १० व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. विजय गोखले, श्री. संजय डहाळे, श्री. मिलिंद शिंदे, श्रीमती आशा शेलार व श्रीमती लिना भागवत यांनी काम पाहिले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या नाटकांच्या नाट्यनिर्मात्यांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले.

व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी झालेल्या सर्व संस्था आणि कलाकार यांनी मेहनत घेऊन सादर केलेल्या सर्व दर्जेदार नाटकांना प्रेक्षकांची भरघोस उपस्थिती होती. भविष्यातही नाट्यनिर्माते व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड  आशिष शेलार यांनी व्यक्त केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement