Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


अल्ताफ दादासाहेब शेख दिग्दर्शित "कर्मयोगी आबासाहेब" सातासमुद्रापार फ्रान्स येथील जगप्रसिद्ध कान्स फिल्म फेस्टिवल साठी निवड... "कर्मयोगी आबासाहेब" चित्रपटास, सांस्कृतिक कलादर्पण गौरव विशेष लक्षवेधी पुरस्काराने सन्मानित...

अल्ताफ दादासाहेब शेख दिग्दर्शित "कर्मयोगी आबासाहेब" आता सातासमुद्रापार फ्रान्स येथील जगप्रसिद्ध कान्स फिल्म फेस्टिवल साठी निवड...

"कर्मयोगी आबासाहेब" चित्रपटास,  सांस्कृतिक कला दर्पण गौरव  विशेष लक्षवेधी पुरस्काराने सन्मानित...

मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - (संजय डुबल)  देशांतर्गत व परदेशी चित्रपट पुरस्कारावर मोहोर उमटवलेला चित्रपट "कर्मयोगी आबासाहेब" आता जगप्रसिद्ध फ्रान्स येथील कान्स फिल्म फेस्टिवल मधील मारशे दु फिल्म मार्केटमध्ये प्रदर्शनास सज्ज झाला. 
    काल मुंबई येथे पार पडलेला मराठी चित्रपट सृष्टीतील मानाचा, व 27 वर्षाची परंपरा असलेला चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठानचा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रंजनी 2025 कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाला 2025 विशेष लक्षवेधी चित्रपट हा पुरस्कार देण्यात आला. या सोहळ्यास प्राजक्ता माळी, गश्मिर महाजनी , निम्मीस कुलकर्णी, प्रभाकर मोरे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव,  सतीश पुळेकर , सब टीव्ही चे हेड  कांचन अधिकारी, सविता प्रभुणे, सुचिता बांदेकर, रेश्मा शिंदे, अनुराधा पौडवाल, आदर्श शिंदे, शुभांगी गोखले, प्राजक्ता हणमघर, चौधरी (दादूस), लय आवडतेस तु मला मालिकेतील तन्मय जक्का, सानिका मोजर, घरो घरी मातीच्या चुली मालिका हृषीकेश रणदिवे, रेश्मा शिंदे,प्रतीक्षा मुणगेकर.मिलिंद दास्ताने आशिष पवार, तेजश्री प्रधान विराज गणेश लटके आदी मान्यवर उपस्थित होते.
    याआधी ही कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाला 30 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
मायाक्का माऊली फिल्म प्रोडक्शन आणि मुंबई क्रिएशन इंटरटेनमेंट, रिलायन्स एंटरटेनमेंट, निर्माता बाळासाहेब महादेव एरंडे आणि मारुती तुळशीराम बनकर निर्मित या चित्रपटात अनेक नामांकित व काही नवोदित कलाकारांनी उत्कृष्ठ अभिनय सादर केला आहे.
     या चित्रपटात अनिकेत विश्वासराव, हार्दिक जोशी, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, देविका दप्तरदार, पृथ्वीक प्रताप, अरबाज शेख, सुरेश विश्वकर्मा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या असून चित्रपटातील सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका उत्तम केल्या आहेत.
       तर या चित्रपटाचे दिग्दर्शक अल्ताफ शेख यांनी आपल्या लेखणी व सादरीकरणाने आबासाहेबांचा जीवनपट अक्षरशः जिवंत केला आहे. ही प्रतिष्ठित निवड झाल्यानंतर "आमच्या कलाकृतीचा आम्हास सार्थ अभिमान आहे." अशी प्रतिक्रिया संपूर्ण टीम कडून व्यक्त करण्यात येत आहे. 
     कान्स येथिल स्क्रीनिंग च्या पूर्ण प्रक्रियेमध्ये फिल्म फेस्टिवल मार्केट कॉर्डिनेटर ब्रिजेश गुरणानी यांचं अत्यंत मोलाचे योगदान लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement