एअर इंडिया चे अहमदाबाद लंडन विमान अपघातग्रस्त...
मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - संजय डुबल - दि. 12- अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या दिशेने उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमान अवघ्या काही मिनिटांत भीषण अपघातग्रस्त झाले.
बोईंग 787 ड्रीमलायनर विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. असे एकूण 242 जण या विमानात होते, यामध्ये 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटनमधील, 7 पोर्तुगालमधील आणि 1 कॅनडाचा प्रवासी होता.
उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमान अचानक नियंत्रण सुटून मेघाणी नगर परिसरातील बी.जे. मेडिकल कॉलेजजवळील इमारतीवर आदळले. इमारतीत अनेक जण होते त्यामुळे जमिनीवरही मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असण्याची शक्यता आहे.
अपघातानंतर लगेचच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, अग्निशमन दल, पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह स्थानिक रुग्णालयांमध्ये नेण्यात आले असून शवविच्छेदन प्रक्रिया सुरू आहे. भारत सरकारच्या DGCA ने तपास सुरू केला आहे. बोईंग आणि GE एअरोस्पेस या कंपन्यांचे तज्ज्ञही या तपासात सहभागी झाले आहेत.
संपूर्ण भारतासह जगभरातून या भीषण विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.


0 टिप्पण्या