१०० भाजीपाला गाड्यांमार्फत रोजगार हे ध्येय लवकरच गाठणार....
शिवसेना प्रणित शिव उद्योग संघटनेचा बळीराजा व महिला बचत गटांसाठी उपक्रम...
मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ( संजय डुबल ) ईशान्य मुंबई महिला आघाडी प्रमुख भारती मोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील पहिल्या शेतकरी ते ग्राहक या योजने अंतर्गत शेतमाल विक्री साठी उपलब्ध करून देण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनास शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष दीपक काळीद, सरचिटणीस प्रकाश ओहळे, उपाध्यक्ष व कृषी समिती प्रमुख गोकुळ लगड, ईशान्य मुंबई संपर्क प्रमुख मंगेश मोहिते, घाटकोपर विधानसभा महिला आघाडी प्रमुख सविता जाधव विलास पोखरकर व शिव उद्योग संघटनेचे स्थानिक पदाधिकारी तसेच वॉर्ड क्रमांक १२८ चे मा. नगरसेवक बाबा हांडे, वॉर्ड क्रमांक १२४ चे मा. नगरसेवक हरुन खान, वॉर्ड क्रमांक १२३ च्या मा. नगरसेविका डॉक्टर भारती बावदाने, घाटकोपर पश्चिम विधानसभा प्रमुख सुबोध बावदाने, शंकर कऱ्हाडे, बाबू साळुंखे हे उपस्थित होते.
सदर उपक्रमास माननीय आमदार दिलीप मामा लांडे साहेब व माननीय आमदार राम कदम साहेब यांनी शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या