Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे '60 आणि 61 व्या हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारां'चे वितरण मोठ्या दिमाखात संपन्न...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे '६० आणि ६१ व्या हीरक महोत्सवी, महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारां'चे वितरण दिमाखात संपन्न...

मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह (संजय डुबल) दि ५-        महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित, आणि सांस्कृतिक कार्य  संचालनालय आयोजित 60 व 61वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
      मराठी चित्रपट आणि सांस्कृतिक वारशाचा गौरवशाली
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात व उत्साहात पार पाडला, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेते अनुपम खेर यांना त्यांच्या अष्टपैलू अभिनयासाठी स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२४, तर अभिनेत्री पद्मश्री काजोल यांना त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय प्रवासाबद्दल स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान केला.
     या वेळी अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना चित्रपट सृष्टीतील त्यांच्या भरीव योगदानासाठी 'चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारा'ने गौरविण्यात आले. प्रसिद्ध गझल गायक भीमराव पांचाळे यांच्या गझल क्षेत्रातील भरीव योगदाना बाबत, 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. तसेच अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना 'चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार' प्रदान करण्यात आला.   
   यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले जागतिक वारसा यादीत सामील करण्यासाठी युनेस्कोमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत विशाल शर्मा यांना 'छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार' प्रदान करण्यात आला. तसेच महाराष्ट्रातील किल्ल्यांचा वारसा जपत नव्या पिढीला इतिहासाशी जोडणाऱ्या 'अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण  महासंघा'लाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. 
     60 व 61 व्या महाराष्ट्र राज्यपुरस्काराने निर्माते, दिग्दर्शक कलाकार तंत्रज्ञ आदी विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले   
   यावेळी अभिनेत्री काजोल यांच्या मातोश्री ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती. तसेच या वेळी मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक तंत्रज्ञ आदी मान्यवर उपस्थित होते.   
                    आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
                                संपादक 
                             संजय डुबल 
                          9172830799

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement