Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


RRR मधील 'नाटु नाटु' या गाण्याने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात रचला इतिहास

मुंबई - संजय डुबल : एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने लाॕस एंजिलेस येथे मोठ्या दिमाखात पार पडलेल्या आॕस्कर पुरस्कार सोहळ्यात इतिहास रचत बेस्ट ओरिजिनल साँग (सर्वोत्कृष्ट मूळ गाणं) विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. भारतीय सिनेसृष्टीसाठी ही गौरवाची बाब आहे.
        याआधी नाटू नाटू गाण्याने प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कारही जिंकला होता. ऑस्कर पुरस्कार जिंकण्यासाठी जगभरातील चित्रपटांमध्ये चुरस रंगलेली असते. 
        ‘नाटू नाटू’ हे 2022 मधील सर्वांत हिट गाण्यांपैकी एक आहे. एम. एम. किरवाणी यांनी हे गाणं संगीतबद्ध केलंय. तर कालभैरव आणि राहुल सिप्लीगुंज यांनी हे गाणं गायलं आहे. चंद्रबोस यांनी हे गाणं लिहिलं आहे.
       RRR या चित्रपटात देशाच्या स्वातंत्र्या पूर्वीचा 1920 चा काळ या चित्रपटात दाखवला गेला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकां भोवती ही कथा फिरते.
        यामध्ये रामचरण, ज्युनियर एनटीआर यांच्यासोबतच आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्याही भूमिका आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement