पाटण - संजय डुबल - पाटण तालुक्यातील धारेश्वर दिवशी येथे काल दुपारी तीन ते साडेतीन चे दरम्यान झालेल्या चक्रीवादळाने दिवशीखुर्द येथील घरांना फटका बसला असुन डुबल वस्तीतील अनेकांचे घरांवरील पत्रे लोखंडां सहीत उडुन गेल्याने घरांचे तसेच घरातील साहीत्याचे मोठे नुकसान झाले.         यामध्ये रमेश डुबल व विष्णू डुबल यांचे घराचे पत्रे लोखंडासह पुर्ण उडुन गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या चक्रीवादळात बौध्द वस्ती मधील घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. 
     सर्कल व ग्रामसेवक सरपंच, पोलिस पाटील प्रीती डुबल यांनी तातडीने नुकसानग्रस्त घरांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. 
      गावात अनेकांचे घरांची पत्रे उडुन जाणे, भिंत पडने असे नुकसान झाले आहे. 
      या चक्रीवादळाचा तडाखा येवढा मोठा होता कि  विजेच्या खांबही वाकला असुन. वीज पुरवठा वायर तुटल्याने काल दुपार पासुन वीज पुरवठा खंडीत झाला असुन, मोबाईल बंद असल्याने संपर्क करण्यास अडचणी येत आहेत. वादळाने परिसरात काही ठीकाणी वाटेवर व रस्यावर झाडे उन्मळुन पडली आहेत.