. आपला महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन मध्ये आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे स्वागत आहे मी सु. बा. सरपडवळ ( पत्रकार , नाट्यसमीक्षक ) मुंबई .आपणास सांगू इच्छितो की नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट तुझ्यासाठी काहीही सदर चित्रपट दादर येथील प्लाझा सिनेमा थिएटर मध्ये पाहण्यात आला, तेव्हा कथा, पटकथा, लेखक आणि दिग्दर्शक व अभिनेता डॉ. संजय गायकवाड यांच्याशी सदिच्छा भेट झाली, सिनेमा पाहून मनात आलेल्या शब्द करुणेने आपणासी संवाद साधू इच्छितो!
खरं सांगू का रसिक प्रेक्षक हो डॉक्टर गायकवाड यांचा तुझ्यासाठी काहीही या सिनेमातील त्यांची भूमिका खरंच कौतुक करण्यासारखी आहे, त्यात काही बारीक सारी त्रुटी आहेत, त्या त्रुटी कडे आपण दुर्लक्ष करता सिनेमा पाहण्याजोगा आहे.
सिनेमा पाहण्यास आमचे सहकारी अभिनेता, संपादक संजय डुबल आणि अभिनेता अशोक सवणे तसेच बाळ गंगा कामगार रंगभूमी चे उपाध्यक्ष राम सारंग हे सुद्धा पनवेल वरून सिनेमा पाहण्यासाठी आले होते. त्यांनी डॉक्टर संजय गायकवाड चे अभिनंदनही केले आणि सिनेमासाठी शुभेच्छा ही दिल्या. ऑर्गन डोनर या विषयावर बनवलेला हा सिनेमा प्रत्येकाने आवर्जून पहावा असा आहे.
तरी जरूर रसिकांनी याची नोंद घेऊन सिनेमा पहावा असे माझे आव्हान आहे
✍️ - सु. बा. सरपडवळ, समीक्षक
टिप - यापुढे दर रविवारी नाटक व सिनेमाचे समिक्षण सुरू करीत आहोत...
आपला प्रतिसाद आमचे साठी महत्वाचा आहे. सहकार्य करावे हि विनंती...


0 टिप्पण्या