Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनोखं अंदोलन, अंदोलनकर्ते सकाळ पासुन मोबाईल टाॕवर वर, आरक्षण मिळे पर्यंत खाली न उतरण्याचा केला निर्धार.

भुम - संजय डुबल - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह - मराठा समाजाचे मराठा आरक्षण मिळणे संदर्भात राज्यभर विविध ठिकाणी मराठा साखळी उपोषण करण्यात सुरू असुन, आज एका अनोख्या आंदोलनाची माहिती समोर येत आहे. पाच मराठा तरुणांनी उंच टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे, आरक्षण जाहीर होणार नाही, तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
भूम तालुक्यातील पाटसांगवी येथील या पाच तरुणांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मोबाईल नेटवर्कच्या टॉवरवर चढलेले असून, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत टॉवरवरून खाली उतरणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
स्वप्निल ज्ञानोबा नाईकनवरे, गौरव आप्पा नाईकनवरे, अभिमान शहाजी भोसले, दत्ता अर्जुन इंदलकर, बालाजी राजाभाऊ रांजवण असे टॉवरवर चढून आंदोलन करणाऱ्या या पाच तरुणांची नावे आहेत. 
     अंधार पडला तरी अंदोलनकर्ते टाॕवरवरच

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण जाहीर होणार नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरू राहणार आहे. आपण खाली उतरणार नाही, अशी ठाम भूमिका या पाच तरुणांनी घेतली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement