Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कै. ज्ञानोजीराव साळंखे हायस्कुल व ज्युनियर कॉलेज पाटण च्या NCC च्या विद्यार्थ्यांचा CATC- 305 CAMP आष्टा येथे संपन्न.

कै. ज्ञानोजीराव साळंखे हाय.व ज्युनियर कॉलेज पाटण च्या NCC च्या विद्यार्थ्यांचा CATC- 305 CAMP आष्टा येथे संपन्न.


पाटण- आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - (चंद्रकांत सुतार)
    १९ महाराष्ट्र बटालियन कराड यांच्या वतीने CATC-305 दहा दिवसाचे वार्षिक ट्रेनिंग कॅम्प अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल आष्टा,ता.वाळवा, जि.सांगली येथे नुकताच संपन्न झाला, सांगली, सातारा जिल्ह्यातील NCC असणाऱ्या शाळेतील ५१० विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश केला होता. 
     यामध्ये कै ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कुल व ज्युनि.कॉलेज पाटण या विद्यालयाचे २० कॅडेट सहभागी झाले व हे  प्रशिक्षण पूर्ण केले.
  चीन व पाकिस्तान सारख्या शत्रुराष्ट्रापासून धोके आहेत. तसेच जागतिक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर बाल वया पासूनच विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देणे काळाची गरज आहे.
मुलां मध्ये राष्ट्रप्रेम, अनुशासन,एकता,साहस अशा विविध गुणांचा विकास अशा NCC कॅम्प मधून होत असतो.
एनसीसी १९ महाराष्ट्र कमांडिंग ऑफिसर के. पद्मनाभन तसेच एस. एम. पदम बहाद्दर थापा व सर्व पी.आय.स्टाफ तसेच साळुंखे हाय.चे श्री पाटील एस.टी सर (CTO) यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्याध्यक्ष  मा. श्री. प्राचार्य अभयकुमार साळुंखे 
सचिव मा. सौ. शुभांगीताई गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी
मा.श्री. कौस्तुभ गावडे, सहसचिव (प्रशासन) मा. प्राचार्य डॉ. शेजवळ आर. व्ही., सहसचिव (अर्थ), मा. प्राचार्य गवळी सर,  अजिव सेवक व कोल्हापूर  जिल्हा विभाग प्रमुख, मा. श्री. श्रीराम शरदचंद्र साळुंख मुख्याध्यापिका सौ.देसाई ए.ए., प्र.उपमुख्याध्यापक श्री देसाई बी.पी. प्र.पर्यवेक्षक श्री शेवाळे एस.टी., मुख्य लिपिक श्री डवरी, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर गुरूदेव सहकारी व पाटण व पंचक्रोशीतील पालक वर्ग यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे(CADET) अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement