Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन...

मुंबई: आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह (संजय डुबल ) मराठी चित्रपटश्रुष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन झाले. २७ ऑगस्ट रोजी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. 
       गेली अनेक दशके त्यांनी मराठी सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.  मराठीसह त्यांनी हिंदीमध्येही उल्लेखनीय काम केले होते. 

सुहासिनी देशपांडे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी हिंदी चित्रपटांतही काम केले होते. मनाचा कुंकू (१९८१), कथा (१९८३), आज झाले मुक्त मी (१९८६),आई शप्पथ..! (२००६), चिरंजीव (२०१६) आणि धोंडी, हिरवा चुडा सुवासिनीचा, मंडळी तुमच्यासाठी काय पण, आम्ही दोघे राजा राणी, कुठं बोलू नका,गडबड घोटाळा, धग, वक्त के पहले (हिंदी), सिंघम (हिंदी) याशिवाय त्यांनी कथा अकलेच्या कांद्याची, राजकारण गेलं चुलीत आणि सासुबाईंचं असंच असतं यांसारख्या नाटकात भूमिका साकारल्या.

रंगभूमीवरील कार्याबद्दल सुहासिनी देशपांडे यांना २०१५ साली अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेतर्फे जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

त्यांच्या पार्थिवावर उद्या पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडणार आहेत. 

 १०० हून सिनेमात काम करणाऱ्या सुहासिनी देशपांडे यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वाचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement