Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयना धरण अपडेट, धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार असल्याने, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा...

कोयना धरण अपडेट...
               कोयना धरण संग्रहीत छायाचित्र 
कोयननगर: आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह-(संजय डुबल )

कोयना धरण पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात येवा सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २:०० वा. सांडव्यावरील विसर्ग वाढवून २०,००० क्युसेक्स करण्यात येणार आहे. येव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल.

धरण पायथा विद्युत गृहामधील २,१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग २२,१०० क्युसेक्स असेल.

कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी 
पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.

                          कोयना धरण
 दिनांक: 28/08/2024
 वेळ: सकाळी 08:00
 पाण्याची पातळी: 2160'10'' (658.622 मी) 
 
 धरण साठवण:
 एकूण: 101.78 TMC (96.70%)
 थेट: 96.66 TMC (96.53%)

 आवक : 42,608 क्युसेक.

 डिस्चार्ज
 रेडियल गेट: 10,000 क्युसेक.
 KDPH: 2100 क्युसेक.

 कोयना नदीत एकूण विसर्ग: १२,१०० क्युसेक

 मिमी मध्ये पाऊस- (दैनिक/संचयी) 
 कोयना- 76/4846
 नवजा- 104/5734
 महाबळेश्वर- 148/5555

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement