Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


मालिका क्षेत्रातील कलाकारांचे बंड.. वेळेत व योग्य मानधन देणाऱ्यां सोबतच काम करण्याचा केला ठाम निर्धार...सोशल मीडिया वर कलाकारांनी व्यवस्थे विरुद्ध व्यक्त केला आपला रोष व्यक्त...

मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह (संजय डुबल ) 
दूरचित्रवाणी क्षेत्रातील कलावंतामध्ये गेले मागील काही वर्षांपासून काम करून झाल्यावर तीन महिन्यांनी मिळत असलेल्या मानधना बाबत असंतोष दिसला.
     या बाबतीत सविस्तर वृत्त असे की सध्या विविध चॅनेल  साठी कलावंतांची गरज लागते, मात्र एखाद्या कलाकारांचे काम संपल्यावर त्याला मिळत असलेलं मानधन हे त्याच दिवशी न मिळता ३ महिन्यांनी मिळते, बऱ्याचदा अशा घटना घडल्या आहेत की ३ महिन्यानी मिळणारे काही जणांचे मानधन हे ८/९ महिने झाले तरी मिळत नाही.बऱ्याचदा मिळणारे मानधन मग बुडवले जाते. त्यात अनेक कलाकार हे कॉर्डिंनेटर अथवा कास्टिंग डायरेक्टर यांचे माध्यमातून आलेले असतात त्यामुळे प्रॉडकशन कलाकारांचे मानधनाची हमी घेत नाही. एकदा का शूट संपले की कास्टिंग डायरेक्टर, कॉर्डिंनेटर कलाकारांचे मानधना बाबत केलेल्या फोन ला प्रतिसाद देत नाहीत, काहीजण सरळ उत्तरे देतात देत नाहीत, नाही मिळणार मानधन काय करायचं ते करा.. मिळणारे मानधन हे अत्यंत कमी मिळत व ते ही वेळेत मिळत नसल्याने अनेक दिवसांपासून कलाकार मंडळी नाराज होती.
    यात भराडला जातो तो, जो कलाकार एक ते तीन चार दिवसांच्या भूमिके साठी काम करतात.. यांनाच कमी मानधन मिळते. त्यांनाही २/३ महिने मानधन साठी रखडावे लागते. मोठ्या भूमिका साकरणाऱ्या कलावंतांचे मानधन हे तेवढेच मोठे असते...यात अनेक तंत्रज्ञ ही भरडले जातात. 
      या बाबतीत आज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर उद्रेक झालेला दिसून आला, शेकडो कलावंतांनी या वेळी आपल्या भावना व्यक्त करत या व्यवस्थे विरुद्ध रोष व्यक्त केला. 
    आज काम आजच मानधन, कमीत कमी २००० मानधन मिळणार असेल तरच काम करण्याचा कलाकारांनी ठाम निर्धार केलेला आहे.व यास प्रतिसाद मोठया प्रमाणावर मिळत आहे.
                                जाहिरात
      जे प्रोडकशन, कॉर्डिंनेटर, कास्टिंग डायरेक्टर वेळेत व योग्य मानधन देणार नाहीत अशांची नावे सोशल मीडिया वर प्रसिद्ध करून त्यांचे सोबत काम न करण्याचा निर्धार अनेक कलावंतांनी आपल्या भावना व्यक्त करताना केला.
   चित्रपट महामंडळ केवळ सभासद करायचं काम करतात, कलाकारांच्या समस्याशी महामंडळाला काहीही देणं घेणं नसत. ते केवळ आपापसात भांडत असतात.असा रोष ही कलावंतांनी व्यक्त केला.
    जवळपास सर्वच कलाकारांचं कुटुंब मिळणाऱ्या मानधनावर अवलंबून असतं, मुलांचे शिक्षण, आजारपण घरचे खर्च सर्वच बाबी असतात, अशावेळी केलेल्या कामाचे वेळेवर पैसे मिळत नसतील तर उपयोग काय त्या पैशाचा ? अनेक कलावंतांनी वेळेत मानधन मिळत नसल्याने अथवा मानधनाची व कामाची शाश्वती नसल्याने कला क्षेत्रालाच रामराम ठोकला आहे.
    त्यामुळे  प्रॉडकशन हाऊस, कॉर्डिंनेटर, कास्टिंग डायरेक्टर यांनी सर्व कलाकारांची भूमिका समजून सहकार्य करवे अशी भूमिका अनेक कलाकारांनी या वेळी मांडली.
     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement