Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


भागोजीशेठ कीर स्मारकाचे भूमीपूजन...

भागोजीशेठ कीर स्मारकाचे भूमीपूजन
    
रत्नागिरी - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - हिंदू समाजसेवक , भंडारी समाजभूषण, दानशूर,महामानव - भागोजीशेठ कीर यांच्या नावाने रत्नागिरी जिल्ह्यातील शहराच्या प्रमुख प्रवेश व्दारा जवळ स्मारकाचे भूमीपूजन मंगळवार दि.०८ ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी ०५ .१५ वाजता महाराष्ट्र राज्यचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री - उदयजी सामंत यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी तमाम भंडारी समाजाच्या बहुगर्दीत अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष - नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या सोबत अनेक समाजातील अनेक कार्य विनित मंडळी खास करून उपस्थित होती  !
हा सोहळा रत्नागिरी नगर परिषद महाराष्ट्र सुर्वण जयंती नगरोत्थान महाअभियान ( जिल्हास्तरीय ) योजनेंतर्गत, दानशूर महामानव-- भागोजीशेठ कीर स्मारकाचे भूमीपूजन झाले तेव्हा व्यासपीठावर राजीव कीर यांनी दानशूर महामानव भागोजीसेठ कीर यांचे थोडक्यात कार्य सांगून उपस्थित सर्व समाजातील मान्यवरांचे यथोचित सत्कार केले ! त्याच वेळी ऐवड मोठं कार्य होतय म्हणून "बाळगंगा पडवणे  श्रमसंघ"      ( पडवणेवाडी -  वरवडे ) तर्फे मयुरेश पडवळ आणि नाटककार - सु़. बा. सरपडवळ यांच्या हस्ते सन्मान पूर्वक मंत्री उदयजी सामंत साहेब आणि अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ* अध्यक्ष- नवीनचंद्र  बांदिवडेकर व रत्नागिरी भंडारी समाजाचे अध्यक्ष - राजीव कीर, कांचन मालगुंडकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला . 

    अभाभंस महासंघाचे अध्यक्ष- नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या मागणीवरून मंत्री- उदयजी सामंत यांनी आपल्या भाषणात म्हटले, श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या उत्तुंग कार्याचा गौरव करताना त्यांना साजेल असे स्मारक आणि पुतळा जे जे स्कूल ऑफ आर्ट संस्थेच्या माध्यमातून बनवून त्या ठिकाणीच त्यांच्या कार्याची महती देणारे दालन बाजूच्या ०४.गुंठे जागेत लवकरच केले जाईल! सोबत संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबांचा पुतळा ही रत्नागिरी शहरात उभारू असे नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या मागणीस आश्वासन दिले. 
नवीनचंद्र बांदिवडेकर , उदयजी सामंत , राजीव कीर, सु बा सरपडवळ  , मयुरेश पडवळ  ( पाठीमागे ) कांचन मालगुंडकर .

रत्नागिरी भंडारी समाज अध्यक्ष - राजीव कीर,  नाटककार - सु .बा.सरपडवळ व विशेष कार्यकर्ता-  मयुरेश पडवळ

     एँड. सौ प्रज्ञा तिवरेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर एस बी खेडेकर, घुडे, कासेकर, लिमये, चंद्रकांत, कॅप्टन दिलीप भाटकर व कांचन मालगुंडकर यांच्या सह अनेक भंडारी बंधूनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले  . 
ADVT.
ADVT
      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement